मुख्य मागणी मान्य झाली, विषय ताणू नका!: राधाकृष्ण विखेंचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले – विरोधकांची लक्तरे आता वेशीवर

मुख्य मागणी मान्य झाली, विषय ताणू नका!: राधाकृष्ण विखेंचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले – विरोधकांची लक्तरे आता वेशीवर


सोलापूर15 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासंबंधी धोरण स्पष्ट केले आहे. याद्वारे त्यांनी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील याची मुख्य मागणी पूर्ण केली. त्यामुळे आता जरांगे यांनी जास्त विषय ताणू नये, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी बुधवारीच कुणबी – मराठा आरक्षणासंबंधी धोरण स्पष्ट केले. मराठवाड्यातील सर्व गावे पूर्वी निजाम संस्थानात होती. त्यामुळे सरकारने ‘कुणबी’ असल्याचे पुरावे दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. पण असे करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची आमचा कोणताही हेतू नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

विषय जास्त ताणू नका

Advertisement

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता त्यांना विनंती आहे की, त्यांनी हा विषय जास्त ताणू नये, असेही ते यावेळी म्हणाले.

ठाकरे अन् पवारांवर हल्ला

Advertisement

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? यासंबधीची एक श्वेतपत्रिका सरकार काढणार आहे. ती निघाल्यानंतर मराठा बांधवांना वस्तुस्थिती समजेल आणि विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगली जातील, असे ते म्हणाले.

पवारांनी आरक्षणासाठी काय केले?

Advertisement

विरोधक जालन्यात जावून भाषणे ठोकत आहेत. पण त्यांनी त्यांच्या काळात मराठा बांधवांचे एवढे नुकसान केले आहे की, त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते समाजबांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनीही यापूर्वी केव्हाच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही, असे विखे पाटील म्हणाले.

आरक्षण महाविकास आघाडीने घालवले

Advertisement

भाजप सरकारमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलेले आरक्षण महाविकास आघाडीने घालवले. आज तेच लोक उपोषणस्थळी जावून भाषण ठोकत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या निर्णयामुळे राज्यातील 25 हून अधिक मुले आयपीएस अधिकारी झाली, असा दावाही विखे पाटलांनी यावेळी केला.

गत अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षणाचा ऱ्हास झाला. आत्महत्या हे आरक्षणाचे उत्तर नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

Advertisement



Source link

Advertisement