मुख्याध्यापकाचे शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, हिंगोलीतील शाळेत धक्कादायक प्रकार


हिंगोली : राज्यात महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आता एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील चाळे केल्याचा आरोप करत शालेय विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.

Advertisement

कळमनुरी तालुक्यातल्या तोंडापूर प्राथमिक शाळेतील साडेअकरा वर्षीय विद्यार्थिनीला २ व ९ एप्रिलला सकाळी नऊ ते बारा वाजता शाळेत स्टोअर रूममध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसंच कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीने पोलिसात दिली आहे. या तक्रारीनंतर मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार यांच्याविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह; ‘ती’ एक आवडच जीवावर बेतली?

दुसऱ्या प्रकरणात याच शाळेतील दहा वर्षीय विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाविरोधात तक्रार केली आहे. शाळेत क्लाससाठी बोलवून तीन मे रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मुख्याध्यपकाने स्टोअर रूममध्ये आपल्याशी अश्लीस चाळे केले. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार विद्यार्थिनीने दिली आहे. यानंतर रात्री दहा वाजता सदर प्रकरणी मुख्याध्यापक भगवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुख्याध्यापकाने केलेल्या या कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये चिंता आहे.

Advertisement

आपण दोघे लग्न करणार आहोत! अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; ती गर्भवती राहताच…Source link

Advertisement