मुख्याध्यापकांवर दाखल होणार गुन्हा: मूळ दस्तावेज जमा करण्याचा व रोखून ठेवण्याचा शाळा व विद्यालयांना अधिकारच नाही


नागपूर19 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कॉन्व्हेंट, शाळा, विद्यालय व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे मूळ (ओरिजनल) दस्तावेज जमा करण्याची सक्ती करणे व नंतर शाळा, विद्यालय सोडताना फि किंवा अन्य कारणासाठी मूळ दस्तावेज रोखून ठेवता येणार नाही. असे करणाऱ्या संचालक व मुख्याध्यापकवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी ही माहिती दिली आहे. सोबतच याविषयी सर्व विद्यार्थी व पालकांना जागरूक राहाण्याचे आव्हान सुद्धा केले आहे.

मूळ दस्तावेज देण्यास नकार

Advertisement

सध्या राज्यात नर्सरी ते नववीच्या अॅडमिशनची धावपळ सुरु आहे. नुकतेच दहावी व बारावीचे निकाल सुद्धा जाहीर झाले आहेत. यातच शाळा व विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारे दस्तावेज संकलित करताना विद्यार्थी व पालकांची धावपळ होताना दिसून येत आहे. अशातच फि बाकी असल्यामुळे व इतरत्र न जाता आपल्याच शाळा कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावे म्हणून स्थानिक शाळा व विद्यालयांनी जमा केलेले आपले मूळ दस्तावेज देण्यास नकार देणे व शाळेतून दस्तावेज गहाळ झाल्याचे सांगून वेळकाढूपणा करीत असल्याच्या काही विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी होत्या.

कायदेशीर कारवाईची तरतुद

Advertisement

याबाबत शेखर कोलते यांनी संबंधित मुख्याध्यापकांशी प्रत्यक्ष भेटून व फोनवर संपर्क करून विचारपूस केली असता शाळेत प्रवेश घेताना मूळ दस्तावेज जमा करणे व राहिलेली पूर्ण फि भरल्याशिवाय ते मूळ दस्तावेज न देणे हा आमचा नियम असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नियमांची प्रत मागितली असता देण्यास सरळ नकार देण्यात आला. विद्यार्थ्याचे मूळ दस्तावेज रोखून ठेवण्याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद व शासनाचे कोणतेही आदेश नसताना सुद्धा कागदपत्रे रोखल्यास कायदेशीर कारवाईची तरतुद असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांचे दस्तावेज परत करण्यात आले.Source link

Advertisement