मुख्यमंत्र्यांनी हात दाखवला नाही: शिंदे हेच भविष्यकाराचे भविष्य पाहतील; दादा भुसे, गुलाबराव पाटलांकडून पाठराखण


मुंबई12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांकडून हात दाखवण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण गुरुवारी मंत्री दादा भुसे यांनी दिले. तर शिंदे कर्तृत्ववान आहेत. तेच भविष्यकाराचे भविष्य पाहतील, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हाणला.

Advertisement

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य पाहिल्याची चर्चाय. त्यावरून सुप्रिया सुळे, अजित पवार ते शरद पवार साऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आता त्याला सरकारमधून उत्तर देण्यात आले.

काल घडले काय?

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. यावेळी शिंदे यांनी ब्रह्मांड शास्त्रज्ञ तथा श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅ. अशोककुमार खरात यांच्या मंत्रोच्चारात ईशान्येश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. पूजेनंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संस्थानतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी शिर्डीकडे कूच केले. यावेळी शिंदे यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याची चर्चाय. यावरून टीका सुरूय.

काय म्हणाले भुसे?

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी शिर्डीला दर्शन घेतले. त्यानंतर सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले. तिथे पूजा केली. हात वगैरे दाखवण्याचा प्रकार झाला नाही. त्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

ते भविष्य निर्माते

Advertisement

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्तृत्ववान आहेत. ते स्वतःचे भविष्य स्वतः तयार करतील. त्यांना भविष्य पाहायची गरज नाही. तर तेच भविष्यकाराचे भविष्य पाहतील, असा टोलाही त्यांनी हाणला.

कार्यकर्त्यांचा आग्रह

Advertisement

गुलाबराव पुढे म्हणाले की, राजकारण म्हटले की नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितले असेल. त्यामुळे मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. कार्यकर्त्यांचा आग्रह मोडवत नसतो म्हणत त्यांनी शिंदेंची पाठराखण केली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement