मुंबई23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कधी कुठे अनुचित प्रकार घडेल हे सहा महिन्याआधीच एसआयटी अहवालात होते. त्यामुळे जिथे दंगली घडवल्या जात आहेत. त्यांना मी सांगेल की, त्यामुळे निवडणुकात काहीही फरक पडणार नाही हे कर्नाटकातील नुकत्याच आलेल्या निवडणुक निकालावरुन स्पष्ट झाले आहे. दंगलीमागील मेंदुना पकडा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. आज त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व मागण्याही केल्या आहेत.
अकोल्याची दंगल मॅनमेड
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अकोल्याची दंगल मॅनमेड दंगल आहे. तिला नियंत्रणात आणण्यासाठी अकोल्याचे एसपी आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी अमरावती रेंजचे डीजी आले आहेत. घटना घडतात तशी तेथे परिस्थिती आहे. एसपींना दंगलखोरांना अटक करण्याची कारवाई करायचे आम्ही सांगितले होते. ती फारशी झाली नाही त्यामुळे काही जणांचे मनोबल वाढल्याची परिस्थीती आहे.
6 महिन्याआधीच एसआयटीचा रिपोर्ट
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कानावर एक बाब घालण्यात आली होती की, नागपूर एसआयटीची रिपोर्ट सहा महिन्याआधीचा रिपोर्ट होता. त्यात महाराष्ट्रात कधी कधी केव्हा केव्हा काय घडू शकते हे होते. या रिपोर्टची काॅपी आम्हाला नाही पण माहिती मिळाली आहे. त्यानुसार, रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मकता दर्शविली आहे.
तपास अधिकारीच एका बॅन संघटनेचे प्रतिनिधी
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शेगावमधील दंगलीत तपास अधिकारी स्वतः एका बॅन संघटनेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहीले होते. शेगावच्या दंगलीत वंचितचे एक आणि डाव्या पक्षाचे एक अशा दोन पदाधिकाऱ्यांचे नावेही गोवण्यात आले आहेत. पण ते त्या ठिकाणी नव्हते. या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे आणि त्यात कारवाई करायला सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
दंगलीमागील मेंदुंना पकडा
प्रकाश आंबेडकर म्हणाले, दंगली वाढवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशा ठिकाणी ठोस कृती केल्याशिवाय दंगली थांबवता येणार नाही. दंगलीमागील मेंदुंना पकडण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही हेच सांगितले की अशांना पकडण्याची गरज आहे.
…म्हणून अकोल्याची दंगल भडकली
प्रकाश आंबेडकर म्हणाले, तीन दिवसांपूर्वी वाॅट्सअॅप चॅटमध्ये एक वक्तव्य सर्वांनी दुर्लक्षित केले परंतु, त्यानंतर ते व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर दंगल पेटली. त्यामुळे भडकवण्याच्या काम सुरू आहे. आम्ही मुस्लीम समाजाला आवाहन करतो की, अशा घटनांकडे गांभिर्याने पाहू नका. जे दंगल घडवत आहेत त्यांनाही मी सांगेल की, दंगल भडकवण्यामुळे निवडणुकीत यश मिळेल असे वाटत असेल तर त्यांनी कर्नाटकचा निकाल पाहायला हवा. वास्तव्यावर लोक मतदान करीत आहेत.
दलित, मुस्लीम भाजपविरोधात
प्रकाश आंबेडकर म्हणाले, गृहमंत्र्यांच्या कानावर त्याच दिवशी घातले व माझे बोलणेही झाले आहे. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहेत त्यामुळे त्यांची भेट घेतली. माझा सुरक्षित मतदारसंघ असताना मी बदलणार नाही. दलितांनी भाजपविरोधात मतदान केले त्यामुळे भाजपची मताची टक्केवारी कमी झाली हे देशातही होईल. मुस्लीमही भाजपच्या विरोधात आहेत अशी परिस्थिती आहे.