मुख्यमंत्र्यांचा मराठावाडा दौरा: ​​​​​​​मुख्यमंत्र्यांकडून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा, परभणीत फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून जल्लोषAdvertisement

परभणी26 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वैदकीय महाविद्यालच्या घोषणेचे स्वागत करत परभणीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आहे. त्यानंतर परभणीकरांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार राहूल पाटील, उपमहापौर भगवानराव वाघमारे, गंगाप्रसाद आनेराव, किर्तीकुमार बुरांडे, गुलमिर खान, अतुल सरोदे यांच्या सह आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Advertisement

परभणी जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याने परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मागील काही वर्षांपासून मागणी सुरू होती. दरम्यान या मागणीसाठी खासदर संजय जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्व पक्षीय आंदोलन सुरू झाले. यात सुरवातीला गावागावात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत जिल्हाधिकारी कार्यलया समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यात जिल्हाभरातून नागरिकांनी सहभागी होत या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता. तर वैदकीय महाविद्यालयासाठी संघर्ष समितीचा ही सातत्याने पाठपुरावा चालू होता.

परंतु या दरम्यान शासनाने वैद्यकीय महाविद्यालयासंबंधी पीपीपीचे धोरण जाहीर केले होते. मात्र तरीही आंदोलन सुरूच होते. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर परभणीकरांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली आहे. तर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न लावून धरला होता. त्यात ऐन मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या शासकीय वैदकीय महाविद्यालयाची घोषणा केल्याने परभणीकरांच्या आम्ही परभणीकर या लढ्याला मोठ यश आल आहे. त्यानंतर परभणीत फटाके फोडत, एकमेकांना पेढे भरवत जोरदार जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement