मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’वर ध्वजारोहण PHOTOS: महाराष्ट्रवासीयांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले- लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार


मुंबई12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

74 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर ध्वजारोहण केले. याप्रसंगी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

Advertisement

लोकशाहीत सर्वांना अधिकार
लोकशाहीत सर्वांना पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांचा ठाणे जिल्ह्यातील आजच्या दौऱ्यावर सीएम शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. आज उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये दौरा आहे. त्या ठिकाणी मोठी रॅली व सभा होणार आहे.

लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार
अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही, अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागले? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याची चिंता नसावी.

Advertisement

पवार साहेब मोठे नेते, आंबेडकर स्नेही
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना व महाविकास आघाडीबाबत केल्या वक्तव्यावर सीएम शिंदेंना प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आमचे स्नेही आहेत. तर शरद पवार हे मोठे नेते आहेत. प्रकाश आंबेडकरांनी काय वक्तव्य केले, त्यावर मी काहीही मत मांडू शकत नाही.

पाहा ध्वजारोहण सोहळ्यातील फोटो

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

राष्ट्रध्वजाला अभिवादन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवर

राष्ट्रध्वजाला अभिवादन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवर

Advertisement

हे ही वाचा…

शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण : राज्य सरकारच्या कामाचा मांडला लेखाजोखा

Advertisement

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशासह राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. – येथे वाचा संपूर्ण बातमी

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement