मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका: घरात बसून राज्याचा कारभार करणाऱ्यांना आम्ही थेट लाईनवर आणले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका: घरात बसून राज्याचा कारभार करणाऱ्यांना आम्ही थेट लाईनवर आणले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Chief Minister Eknath Shinde’s Criticism Of Uddhav Thackeray, We Brought Those Who Are Running The State Sitting At Home On The Direct Line

परभणी9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्र सोडले आहे. काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन बसून करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो. ते आज परभणीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी परभणीचा विकास करु असे आश्वासनही दिले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. पण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याची आमची भूमिका आहे, त्याचसाठी आम्ही अनेक योजना आणत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन दिले.

Advertisement

महिलांना स्वत:च्या पायावर उभे क करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगट आपल्याला तयार आहे. महिलांसाठी अनेक विशेष योजनांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना त्यांचे कुटुंब सांभाळताना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचे काम शासन आता करणार आहे.

Advertisement



Source link

Advertisement