नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सुप्रसिद्ध लेखक वंसत वसंत लिमये यांच्या ‘टार्गेट असदशहा’ या थरार रहस्यमय कादंबरीच्या निमित्ताने मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत लेखक, अभिनेता दिपक करंजीकर घेणार आहेत. गुरूवारी (दि.२६) सायंकाळी सहा वाजता डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, गंगापूर रोड येथे मुलाखत होणार आहे. मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘टार्गेट असदशहा’ कादंबरीत आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय तणाव, सत्तेचं आर्थिक राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारं चित्तथरारक कथानक आहे.
कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास ९०.०८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकुर, रेडिओ विश्वासचे समन्वयक ऋचिता ठाकूर तसेच विनायक रानडे यांनी केले आहे.