मुंबई इंडियन्स संघात मोठी फूट होतेय गटबाजीचे राजकारण; मोठ्या खेळाडूचे मत

मुंबई इंडियन्स संघात मोठी फूट होतेय गटबाजीचे राजकारण; मोठ्या खेळाडूचे मत
मुंबई इंडियन्स संघात मोठी फूट होतेय गटबाजीचे राजकारण; मोठ्या खेळाडूचे मत

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १० संघ खेळत आहेत. यातील ९ संघांनी किमान एकतरी विजय मिळवला आहे. पण मुंबई इंडियन्ससाठी हा हंगामात आत्तापर्यंत तरी पूर्ण अपयशी ठरलेला दिसून येत आहे. कारण, त्यांनी आत्तापर्यंत ७ सामने खेळले असून एकाही सामन्यात विजय मिळवलेला नाही. या हंगामात विजय न मिळालेला मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतेच ख्रिस लिनने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ख्रिस लिनच्या मते मुंबई संघ तुकड्या तुकड्यांमध्ये विभागली गेली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना लिन म्हणाला, ‘जिंकणे आणि पराभूत होते, सवयीचा भाग आहे. मुंबईची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्याबरोबर मानसिकता यामध्ये समस्या आहे. असं वाटत आहे की, संघ गटागटांमध्ये विभागला गेला आहे.’

Advertisement

तसेच लिन म्हणाला, ‘जेव्हा गुणतालिकेत तुम्ही सर्वात खाली असता, तेव्हा कर्णधाराप्रमाणे कायरन पोलार्डही सामान्यत: डीप मिड ऑन आणि मिड ऑफवरून मदत करत असतो, तुम्हाला शांत करत असतो. आपण मुंबईसोबत आत्तापर्यंत असे होताना पाहिलेले नाही कारण आता ते छोट्या छोट्या गटांमध्ये विभागण्यास सुरुवात झाले आहे. हा चांगला संकेत नाही. मला वाटते की ड्रेसिंग रुममध्ये देखील चांगले वातावरण नसेल.’

लिन यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तसेच पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या मुंबई संघाचाही तो भाग राहिलेला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘जेव्हा ते २ वर्षांपूर्वी स्पर्धा जिंकले होते, तेव्हाच्या तुलनेत गोष्टी उलट्या आहेत. तेव्हा नेहमी चर्चा होत असायची की, आपण अजून चांगली कामगिरी कशी करू शकतो. या सर्व चर्चा कोचिंग स्टाफव्यतिरिक्तही व्हायच्या. कारण सर्वजणांना जिंकायचे होते. पण यावेळी असे काहीही दिसून येत नाही, सर्व उलट दिसत आहे. असं वाटत आहे की, ११ खेळाडूंचा संघ नाही, तर ११ वेगवेगळे खेळाडू मैदानात उतरले आहेत.’त्याचबरोबर लिन आशा व्यक्त केली आहे की लवकरच सर्व ठिक होईल आणि मुंबई चांगले क्रिकेट खेळेल. मुंबईला आता आठवा सामना रविवारी (२४ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे.

Advertisement