मुंबई इंडियन्सने आता सनरायझर्स हैदराबादला बाहेर काढणार का मुंबईचा गेम होणार, वाचा…

मुंबई इंडियन्सने आता सनरायझर्स हैदराबादला बाहेर काढणार का मुंबईचा गेम होणार, वाचा...
मुंबई इंडियन्सने आता सनरायझर्स हैदराबादला बाहेर काढणार का मुंबईचा गेम होणार, वाचा...

आयपीएलच्या १५व्या हंगामात आज मंगळवारी मुंबई इंडियन्सची लढत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतून बाद झालेल्या मुंबईकडे या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही. पण हैदराबादसाठी मात्र ही लढत महत्त्वाची आहे.

MI vs SRH हेड-टू-हेड:

Advertisement

एकूण सामने १८

हैदराबाद: ८

Advertisement

मुंबई: १०

आयपीएल २०२२ आता लीग टप्प्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाली आहे. या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. या भागात, मंगळवार, १७ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई एकीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहेत तर, हैदराबादला अंतिम ४ मध्ये पोहोचण्याचे आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. जर संघ आज हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून औपचारिकपणे बाहेर होईल. दुसरीकडे, मुंबईचा संघ हैदराबादचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

Advertisement

जसप्रीत बुमराह: मुंबई इंडियन्सचा सध्याचा सक्रिय यशस्वी गोलंदाजासाठी हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. पण अखेरपर्यंत त्याने आपली लय परत मिळवली आहे आणि तो सनरायझर्ससाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. बुमराहने आतापर्यंत १२ सामन्यात ११ बळी घेतले आहेत. या वेळी त्याची इकॉनॉमी ७.१९ असून १० धावांत ५ विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टी नटराजन: यॉर्कर किंग नटराजन आपल्या वेगानं प्रभावित करत आहे. आजच्या सामन्यात त्याने एक विकेट घेतल्यास सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. नटराजनने १० सामन्यातून १८ बळी घेतले. १० धावा देऊन तीन बळी त्याची सर्वोत्तम कामगिरी असून यादरम्यान त्याची इकॉनॉमी ८.८७ ची राहिली आहे.

Advertisement

सनरायझर्स संघाचे सध्या १२ सामन्यातून १० गुण आहेत. अशा परस्थितीत संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकला तर १४ गुण होतील जे प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे हैदराबाद संघाला शिल्लक दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास त्यांचा आशा काहीशा पल्लवित राहतील. याशिवाय अन्य संघाच्या परिणामावर ते अवलंबून असतील.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यातील आकडेवारीचा खेळ

Advertisement

•यापूर्वी दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या ६ सामन्यात मुंबईने पाच तर हैदराबादने एक सामना जिंकला आहे.

• सनरायझर्सच्या भुवनेश्वर कुमारने १३९० डॉट बॉल टाकले आहेत, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त आहे.

Advertisement

संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रमणदीप सिंह, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, कुमार कार्तिकेय सिंह, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, जगदीश सुचित, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

Advertisement