मुंबई इंडियन्सच्या सर्वात महागड्या खेळाडूला अर्जुनच्या लक्ष्य भेदाने केलं त्रिफळाचीत, काय आहे नेमके वाचा…

मुंबई इंडियन्सच्या सर्वात महागड्या खेळाडूला अर्जुनच्या लक्ष्य भेदाने केलं त्रिफळाचीत, काय आहे नेमके वाचा...
मुंबई इंडियन्सच्या सर्वात महागड्या खेळाडूला अर्जुनच्या लक्ष्य भेदाने केलं त्रिफळाचीत, काय आहे नेमके वाचा...

आयपीएल२०२२ मध्ये सहभागी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. पण यंदाच्या हंगामात मात्र मुंबईच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिले सहाच्या सहा सामने गमवावे लागले आहेत. गोलंदाजीतील धार कमी झाल्याने संघ त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आज चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यासाठी आयपीएल पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तशातच त्याचा एक भन्नाट यॉर्कर वाला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अर्जुन २०२१ पासून मुंबई संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी त्याला संघात खेळायला मिळाले नाही. नेट्समध्ये मात्र त्याने गोलंदाजी केली. यंदाच्या हंगामातही त्याने अद्याप संघात स्थान मिळवलेले नाही. पण नेट्समधील त्याचा एक सराव सत्राचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने सराव सत्रात मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशनचा त्रिफळा उडवला. भन्नाट य़ॉर्कर चेंडू टाकत त्याने इशानला क्लीन बोल्ड केले.

Advertisement

दरम्यान, मुंबईच्या संघाने मेगालिलावात विकत घेतलेल्या अनेक खेळाडूंना संघात संधी देऊन पाहिली, पण अजूनही मुंबईच्या संघाला सूर गवसला नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संघात स्थान देण्यात यावे, असा सूर काही दिग्गज क्रिकेटपटू आणि नेटकऱ्यांकडून आळवला जात आहे. अर्जुन तेंडुलकरला चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध आजच्या सामन्यात आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. अर्जुनला ऑलराऊंडर म्हणून मुंबईच्या संघात २० लाखांना विकत घेण्यात आले. तो आज मुंबईच्या संघात एका स्टार खेळाडूची जागा घेऊ शकेल अशी चर्चा आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामाची सुरूवात निराशाजनक झाली आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. जर त्यांचा आणखी एक पराभव झाला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल. अशातच कर्णधार रोहित शर्मा याने मुंबईचा जुना सहकारी धवल कुलकर्णी याला संघात समाविष्ट करून घेण्याचा पर्याय संघमालकांना सुचवल्याची चर्चा आहे. यंदाच्या पर्वात डेथ ओव्हर्समध्ये मुंबईला स्पेशालिस्ट गोलंदाजाची उणीव भासत आहे. ही कमकुवत बाजू बळकट करण्याण्याच्या दृष्टीने त्याने धवलचं नाव सुचवल्याचं बोललं जात आहे. तशातच धवल कुलकर्णीने एक ट्वीट केल्याने चाहते अधिकच गोंधळात पडलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी हा लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये धवल कुलकर्णीवर कोणीच बोली लावली नाही. त्यानंतर तो आयपीएल २०२२ च्या हिंदी समालोचकांच्या टीमचा सदस्य झाला. पण, आता तो पुन्हा संघात येणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान त्याच्या एका ट्वीटने चाहते गोंधळात पडले आहेत. “मी कुठे चाललोय का?” असं ट्वीट त्याने केल्यामुळे या सर्व बातम्या खऱ्या की खोट्या या चाहत्यांना अंदाज लावणं अधिकच कठीण झाल्याचं दिसत आहे.

Advertisement