मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी चिंतेत, खेळाडूंशी केली चर्चा

मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी चिंतेत, खेळाडूंशी केली चर्चा
मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी चिंतेत, खेळाडूंशी केली चर्चा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्ससाठी १५ व्या हंगामाची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली आहे. मुंबईने चालू हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी एकही सामना संघ जिंकू शकला नाहीय. सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे. अशात मुंबई फ्रेंचायझीच्या मालकीन निता अंबानी यांच्याकडून संघाला प्रोत्साहन मिळाले आहे.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. मुंबईने आतापर्यंत ५ वेळा या टी-२० लीगचे विजेतेपद पटकावले आहे. परंतु चालू आयपीएल हंगामात मात्र संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीय. हंगामातील पहिले चारही सामने मुंबईने गमावले आहेत आणि संघ त्यांच्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

Advertisement

आरसीबीविरुद्ध ८ एप्रिल रोजी मुंबईला हंगामातील सलग चौथा पराभव मिळाला आणि त्यानंतर स्वतः निता अंबानी यांनी फोनवरून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

“मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माहितीय की आपण पुढे जाऊ. आता आपण फक्त पुढे आणि वरच्या दिशेने जाणार आहोत. आपण स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे की, आपण विजय मिळवू. आपण आधीही अनेकदा अशा परिस्थितीचा सामना केला आहे आणि नंतर ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की, जर तुम्ही एकमेकांसोबत असाल, तर आपण या परिस्थितीवर मात करू. तोपर्यंत तुम्हाला, जे काही करायचे आहे, त्यासाठी माझी पूर्ण साथ आहे. कृपया एकमेकांवर विश्वास दाखवा, स्वतःवर विश्वास ठेवा. मुंबई इंडियन्स नेहमीच तुम्हाला समर्थन देण्यासाठी उपलब्ध आहे.” असे निता अंबानी म्हणाल्या.

दरम्यान, आयपीएल २०२२ मधील संघाच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मिळालेल्या पराभवासह संघाने अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबईला मात दिली. तसेच चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबईला धूळ चारली. आता मुंबईला त्यांचा पुढचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध १३ एप्रिल रोजी खेळायचा आहे.

Advertisement