मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते पदार्पणाची संधी

मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते पदार्पणाची संधी
मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते पदार्पणाची संधी

मुंबई इंडियन्ससाठी बहुचर्चित ठरलेल्या अर्जुन तेंडुलकरला केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते. अर्जुनला गेल्यावर्षीही मुंबईने आपल्या संघात घेतले होते, पण त्याला एकही संधी दिली नव्हती. पण आता तिसऱ्या सामन्यात अर्जुनला संधी मिळू शकते. अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळायला उतरणार तरी कधी, हा प्रश्न आतापर्यंत चाहत्यांना बऱ्यादा विचारला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर त्यांना मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात मिळू शकते. अर्जुनसाठी ही आयपीएलमधील पदार्पणाची संधी ठरू शकते. अर्जुन दोन वर्षे मुंबईच्या संघात असून त्याला एकदाही संधी देण्यात आलेली नाही, पण यावेळी त्याला संधी का मिळू शकते.

अर्जुन तेंडुलकरला का मिळू शकते संधी, जाणून घ्या…

Advertisement

मुंबई इंडियन्सला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा कच्चा दुवा ही गोलंदाजी राहीलेली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, पण गोलंदाजांना मात्र अजूनही लय सापडलेली दिसत नाही. गेल्या सामन्यात तर वेगवान गोलंदाज बासिल थम्पीने एकाच षटकात २६ धावा दिल्या होत्या.

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजी करण्याची एकही संधी दिली नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाला सध्याच्या घडीला तरी एका युवा वेगवान गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे अर्जुनसाठी ही एक नामी संधी असल्याचे म्हटले जात आहे. त्याचरोबर रोहित शर्मा हा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या सामन्यातही त्याने अनमोलप्रीत सिंगला संधी दिली होती. त्यामुळे आता अर्जुनच्या पुनरागमनचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

थम्पीच्या जागी अर्जुन यावेळी संघात येऊ शकतो. गेल्यावर्षी अर्जुनला संघात घेण्यात आले होते. पण तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाबाहेर गेला होता. यावर्षी झालेल्या लिलावात मुंबईच्या संघाने पुन्हा एकदा अर्जुनला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे अर्जुन मैदानात नेमका उतरणार कधी, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही मुंबईच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जेव्हा अर्जुन मैदानात उतरेल तेव्हा मैदानात बसून त्याचे वडिल हा सामना पाहू शकतात. हा योगायोग सचिनच्या आयुष्यात लवकरच येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता अर्जुन कधी मैदानात उतरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण आतापर्यंत एकही सामना न खेळता अर्जुन तेंडुलकरला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे, त्यामुळे यावेळी मैदानात उतरून तो आपल्या टीकाकारांना चांगले उत्तर देऊ शकतो.

Advertisement