मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची रोहित शर्माला विनंती की, अजून सामना हाराकिरी करू नकोस

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची रोहित शर्माला विनंती की, अजून सामना हाराकिरी करू नकोस
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची रोहित शर्माला विनंती की, अजून सामना हाराकिरी करू नकोस

आयपीएलचा १५वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब ठरला आहे. पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाने या हंगामात सुरुवातीच्या सहा लढती गमावल्या आहेत. अखेरच्या झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर मुंबई संघावर त्याच बरोबर रोहित शर्मा यांना ट्रोल केले जात आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने सलग सहा सामने कधीच गमावले नाहीत. याआधी त्यांनी २०१४ साली सलग पाच सामने गमावले होते. इतकी वाईट सुरूवात झाल्यानंतर आता मुंबईच्या चाहत्यांना इतकीच ईच्छा आहे की त्यांच्या संघाने आयपीएलमधील लाजिरवाणा विक्रम करू नये.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला या वर्षी मात्र मोठा झटका बसला आहे. मुंबईचा संघ सध्या खराब कामगिरीच्या फेऱ्यात अडकला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर संघ कमकूवत झाल्याची चर्चा होती आणि आता स्पर्धा सुरू झाल्यानंतर ते खर असल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्स असा एकमेव संघ आहे ज्याल अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. रोहित आणि कंपनीला विजयाचे सूत्र सापडले नाही. सलग ६ पराभव झाल्यानंतर आता मुंबईचा संघ एका नकोशा विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात सलग सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर तरी होणार नाही ना अशी काळजी चाहत्यांना वाटत आहे.

Advertisement

आयपीएलमध्ये ३ असे संघ आहेत त्यांनी सलग सर्वाधिक सामने गमावले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम पुणे वॉरियर्स इंडियाच्या नावावर आहे. या संघाने २०१२ आणि २०१३ मध्ये सलग ११ लढती गमावल्या होत्या. या दोन हंगामात पुण्याचा संघ गुणतक्त्यात एकदा सर्वात तळाला तर एकदा तळातून दुसऱ्या क्रमांकावर होता.

दिल्ली कॅपिटल्सचे आधीचे नाव दिल्ली डेयरडेव्हिल्स होते. सलग सहा हंगामात दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हे. या संघाची २०१४ सालची कामगिरी अतिशय खराब झाली होती. त्यांनी सलग ९ सामने गमावले होते. तर २०१५च्या हंगामातील पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या. त्यामुळे दिल्लीच्या नावावर सलग ११ सामने गमावण्याचा विक्रम आहे.

Advertisement

पुणे आणि दिल्लीनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा क्रमांक लागतो. दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या केकेआरची २००९ साली प्रचंड खराब कामगिरी झाली होती. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लढतीत केकेआरने सलग ९ सामने गमावले होते.

Advertisement