मुंबई इंडियन्सचे आठ कोटी पाण्यात; जोफ्रा आर्चर आयपीएल आणि उरलेल्या येणाऱ्या मालिकेतून बाहेर

मुंबई इंडियन्सचे आठ कोटी पाण्यात; जोफ्रा आर्चर आयपीएल आणि उरलेल्या येणाऱ्या मालिकेतून बाहेर
मुंबई इंडियन्सचे आठ कोटी पाण्यात; जोफ्रा आर्चर आयपीएल आणि उरलेल्या येणाऱ्या मालिकेतून बाहेर

इंग्लंडचा वेगावान गोलंदाज जोफ्रा आर्चर पाठीच्या दुखण्यामुळे संपूर्ण हंगामाला मुकला आहे. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. याचा अर्थ जोफ्रा आर्चर जुलैमध्ये होणाऱ्या भारताविरूद्धच्या कसोटीला देखील मुकणार आहे. जोफ्रा आर्चरच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सला देखील यंदाच्या आयपीएल हंगामात मोठा फटका बसला आहे. मुंबईने २०२० च्या आयपीएल मेगा लिलावात तब्बल ८ कोटी रूपये खर्चून आपल्या संघात घेतले होते.

याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अधिकृतरित्या दिलेल्या वक्तव्यात सांगितले की, ‘जोफ्रा आर्चरच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे इंग्लंडच आणि ससेक्सचा वेगावान गोलंदाज जोफ्रा आर्चर उर्वरित संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.’ विशेष म्हणजे इसीबीने तो कधी परत येणार याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. म्हणजे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. ‘जोफ्रा कधी परतणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत तज्ज्ञांचे मत काही दिवसात येईल त्यानंतर व्यवस्थापन त्याच्याबाबत काही योजना आखू शकले.’ भारत जुलै महिन्यात एकमेव कसोटी सामना जो गेल्या दौऱ्यात राहिला होता तो खेळेल. तसेच सहा मर्यादित षटकांचे सामने देखील खेळले जातील.

Advertisement

२७ वर्षाच्या जोफ्रा मार्च २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. भारताविरूद्धच्या या मालिकेनंतर त्याच्या खोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने ससेक्सकडून काऊंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या जाणवू लागली. बार्बाडोसमध्ये जन्मालेल्या जोफ्राने इंग्लंडकडून ४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तीनही फॉरमॅटमध्ये त्याने ८६ विकेट्स घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चर याची दुखापत इंग्लंड क्रिकेट संघासाठी मोठा झटका मानली जात आहे. पुढच्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आर्चरच्या या नवीन दुखापतीविषयी माहिती दिली आहे. बोर्डाने आर्चर आगामी हंगामात सहभाग घेणार नाही, याविषयी पुष्टी केली आहे. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील चालू हंगामात आर्चरला खरेदी केली होते, पण दुखापतीमुळे तो संघासोबत सहभागी होऊ शकला नाही.

ईसीबीने सांगितेल्याप्रमाणे, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनाची वेळ निश्चित नाहीये. बोर्ड याबाबतीत एखाद्या तज्ञाकडून सल्ला हघेणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रामाणे पाठीच्या खालच्या भाग ताणला गेल्यामुळे आर्चर इंग्लंड आणि ससेक्स संघाच्या आगामी मालिकांमधून माघार घेत आहे. तो कधी पुनरागमन करेल, याविषयी सध्या काहीच सांगता येणार नाहीये. दुखापतीमुळे आर्चर मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक देखील खेळला नाही. त्याची किंमत इंग्लंड संघाला मोजावी लागली. इंग्लंडला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात जर आर्चर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असता, तर परिस्थिती वेगळी असू शकत होती.

Advertisement

दरम्यान, आर्चर मागच्या १६ महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने २० मार्च २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यामध्ये इंग्लंडसमोर भारतीय संघ होता आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा टी-२० सामना पार पडला होता. आर्चरने २१ महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट खेळला होता. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये खेळला होता. कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर त्याने या प्रकारातील शेवटचा सामना २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. हा सामना देखील भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये पार पडला होता.

Advertisement