पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहने एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच बुमराहने हार मानल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच बुमराहने जे म्हटले आहे, त्यावरून त्यांची सध्याची परिस्थिती समोर येत आहे. पाचवा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने एक मोठं विधान केलं आहे. आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे. पण मुंबईसाठी पाचवा सामना फार महत्वाचा आहे. पण पाचवा सामान सुरु होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराहने हार मानल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाचवा सामना सुरु होण्यापूर्वी बुमराह नेमकं काय म्हणाला, पाहा…
बुमराह यावेळी म्हणाला की, ” यापूर्वी जे काही घडलं तो आता इतिहास झाला आहे. आम्ही यावेळी जे नियोजन केलं होतं, त्यामध्ये आम्हाला अजूनही यश मिळालेले नाही. आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, ज्या रणनिती आखल्या होत्या त्यामध्ये आम्हाला अजूनही यश मिळालेले नाही. प्रत्येक संघ हा बॅड पॅचमधून जात असतो. संघात काही नवीन खेळाडू आहेत आणि ते संघाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लवकरच आमची गाडी रुळावर येईल. आतापर्यंत आम्ही हरलेलो असलो तरी आम्ही आव्हानांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला यश येईल, अशी आशा आहे. पण एकदा का संघाने पहिला विजय मिळवला तरी आमची गाडी रुळावर येईल आणि धावायला लागेल. त्यासाठी पहिला विजय आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे.”
यावर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच बदल झाले आहेत. बरेच नवीन खेळाडू संघात दिसत आहेत. पण त्यांना अजूनही लय सापडलेली दिसत नाही. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. सातत्याने यश मिळवण्यात हे अनुभवी खेळाडूही अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला अजूनही लय सापडलेली नाही. त्यामुळे आता पाचव्या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
बुमराहने पुढे सांगितले की, ” यावर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर खेळपट्याही फलंदाजांसाठी पोषक आहेत. त्यामुळे गोलंदाजांना चांगली कामगिरी करायला थोडी अडचण येत असेल. पण कालांतराने गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसू शकतील, त्यामुळे आयपीएलचा रोमांच अजून वाढू शकतो.”