मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातला शेवटच्या सामन्यानिमित्त रोहित शर्माचे चाहत्यांना भावनिक आवाहन

मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातला शेवटच्या सामन्यानिमित्त रोहित शर्माचे चाहत्यांना भावनिक आवाहन
मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातला शेवटच्या सामन्यानिमित्त रोहित शर्माचे चाहत्यांना भावनिक आवाहन

मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातला शेवटच्या सामन्यानिमित्त रोहित शर्माने चाहत्यांना भावनिक आवाहन करत त्यांच्या पाठिंब्याला सलाम केला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक नाट्यपूर्ण घटना पाहायला मिळल्या आहेत. तसेच अनेक धक्कादायक निकालही पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर झाले आहेत. त्याचमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे.

मुंबईने आयपीएल २०२२ हंगामात आत्तापर्यंत १३ सामने खेळले असून केवळ ३ सामने जिंकले आहेत आणि १० सामने पराभूत झाले आहेत. त्यांना अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २१ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Advertisement

रोहितने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, यावेळी चाहत्यांनी त्यांना स्टेडियममध्ये येऊन खूप प्रेम दिले. तसेच त्याने याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर रोहितने हे देखील मान्य केले की, जरी संघाची कामगिरी या हंगामात चांगली झाली नसली, तरी चाहत्यांनी संघाची साथ सोडली नाही, तर अजून प्रेम दिले. रोहित असेही म्हणाला की, मला चाहत्यांप्रती वाईट वाटत आहे की, त्यांच्यासाठी आम्ही चांगले खेळू शकलो नाही. आम्ही जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने रोहितने चाहत्यांप्रती केलेले महत्त्वाचे विधान लिहिले आहे. रोहित या व्हिडिओमध्ये म्हणाला, ‘ते मोठ्या संख्येने आले आणि आम्हाला कठीण काळातही पाठिंबा दिला, माझ्या मते हेच खरे चाहते आहेत.’ रोहितचे हेच विधान कॅप्शनमध्ये लिहित मुंबई इंडियन्सने पुढे लिहिले आहे की, ‘आपल्या ‘कॅप्टन रो’ (रोहित)चा तुम्हाला एक स्पेशल मेसेज, पलटन!’

Advertisement

हा आयपीएल हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खूपच निराशाजनक ठरला आहे. त्यांनी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हंगामातील १० पराभव पाहिले आहेत. तसेच त्यांना हंगामातील त्यांच्या पहिल्या आठही सामन्यात सलग पराभवाचा सामना करावा लागला होता.

Advertisement