मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आयपीएल अर्धवट सोडून पोहचला ऑस्ट्रेलियात, नेमके काय कारण वाचा…

मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आयपीएल अर्धवट सोडून पोहचला ऑस्ट्रेलियात, नेमके काय कारण वाचा...
मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आयपीएल अर्धवट सोडून पोहचला ऑस्ट्रेलियात, नेमके काय कारण वाचा...

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ वा हंगाम खेळला जात आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची शेफिल्ड शील्ड स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेचा अंतिम सामना पर्थमध्ये ३१ मार्च रोजी खेळला गेला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या म्हणजेच ५ व्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची एक झलक पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाची शेफिल्ड शील्ड स्पर्धेचा अंतिम सामना विक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळला गेला. अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी विक्टोरिया संघाचा फिरकी गोलंदाज निक मेडिनसन याने सामन्यात ५ षटके गोलंदाजी केली. सामन्यादरम्यान मेडिनसने असे काही केले, ज्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. मेडिनसनने या महत्वाच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे अनुकरण केल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Advertisement

व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, मेडिनसनने केलेली ही नक्कल पाहून, मैदानातील त्याचे सहकारी खेळाडूही हसू लागले. एवढेच नाही समालोचकही या प्रसंगानंतर स्वतःचे हसू रोखू शकले नाहीत. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, समालोचक म्हणत आहेत की, ‘वेल डन बुमराह’. मेडिनसनच्या या चेंडूचा रिप्ले पाहिल्यानंतर समालोचक पुन्हा एकहा हसताना दिसले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने तर अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ही जसप्रीत बुमराजची चायनीज कॉपी आहे.’ तर एकाने लिहिले की, ‘थांब आत्ताच बुमराहला तुझे नाव सांगतो.’

अंतिम सामन्यात विक्टोरिया संघाने नाणेफेक जिंकली आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ३८६ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विक्टोरिया संघ ३०६ धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सच्या नुकसानावर ४०० धावा केल्या. याचसोबत शेफिल्ड शील्डचा हा अंतिम सामना अनिर्णीत राहिला. सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम व्हाइटमॅनला सामनावीर निवडले गेले. त्याने पहिल्या डावात ८५ आणि दुसऱ्या डावात १२३ धावा केल्या.

Advertisement