मुंबईत प्रथमच 3 दिवस राष्ट्रीय संमेलन: देशातील सत्ताधारी, विरोधक अडीच हजार आमदार येणार एकाच व्यासपीठावर!


जळगावएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एमआयटी स्कूल पुणेतर्फे प्रथमच देशातील आमदारांचे १५ ते १७ जून या कालावधीत तीन दिवसीय संमेलन बीकेसी जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला देशातील अडीच हजार आमदार येण्याची अपेक्षा आहे. संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, मतदार संघ विकसित करण्याची कला, आपली प्रतिमा तयार करा यासह विविध विषयांवर ४० समांतर सत्र व गोलमेज परिषद होणार असून प्रत्येक सत्रात ५० आमदार चर्चा करणार आहेत. विधानसभेचे सभापती,संसदीय कार्यमंत्री व विरोधी पक्षनेते या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

Advertisement

राष्ट्रीय आमदार संमेलनाबाबत आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे व संजय सावकारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यातील आमदारांना या संमेलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे.

संमेलनाचे उद्घाटन १६ जून रोजी होणार आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ.मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत.या संमेलनाला अडीच हजार आमदार येण्याची अपेक्षा असून आतापर्यंत अठराशे आमदारांनी सहमती दर्शवली आहे.

Advertisement

राष्ट्रीय आमदार संमेलन देशातील वेगवेगळ्या राज्यातील आमदारांमध्ये संवाद घडवणे, सुशासनाच्या मुद्द्यांवर शिकणे व लोकशाहीला शक्तिशाली बनवण्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत.महाराष्ट्र शासन या संमेलनाच्या आयोजनात यजमानाच्या भूमिकेतून सहभागी झाले आहे.नोकरशहा आणि आमदार हा विषयही सत्रांमध्ये ठेवण्यात आला आहे.

गोलमेज परिषदेत राजकारणाचे अध्यात्मिकीकरणावरही होणार चर्चा

Advertisement

गोलमेज परिषदेत आमचे लक्ष, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकरण : अध्यात्मिक नेत्यांची चर्चा, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन, विधीमंडळाचे कामकाज, आव्हाने व मार्ग,कायदा आणि नागरिक, भारत २०४७, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लीडर्सची चर्चा, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.संपादक,ज्येष्ठ पत्रकारांची चर्चा,कायदा आणि नागरिक अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. कायदे तज्ज्ञही मार्गदर्शन करणार आहेत.Source link

Advertisement