मुंबई15 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
मुंबईतील गोरेगाव फिल्मसीटीतील ‘गुम है किसी के प्यार मे’ टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग मोठी असून या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अद्यापही काही कलाकार या आगीत आडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
Advertisement
गोरेगाव फिल्मीसीटीतील घटना
आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या गोरेगाव फिल्मीसीटीत दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जवान करीत आहेत. ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेचे शुटींग या ठिकाणी सुरू होते.
Advertisement
बचावकार्य सुरू
गोरेगाव फिल्मीसीटीत लागलेल्या आगीमुळे धुराचे लोळ उठत असून आग बाजूला पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच सेटमध्ये लागलेल्या आगीत काही सहकलाकार आणि इतर व्यक्ती अडकल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement