- Marathi News
- Local
- Maharashtra
- Aurangabad
- I Am Not A Rebel, I Am Following The Orders Of Sharad Chandra Pawar, Voters Took The Election In Their Hands; My 25 Years Of Work Is My Strength Pradeep Solunke
औरंगाबाद5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादीच्या हितासाठी मी माझ्या शिक्षक नोकरीचा त्याग केला. प्रचार प्रसारात आणि चांगले वक्ते घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तरी मला उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे संधी मिळत नसेल तर खेचून आणा, असे पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांनीच सांगितले आहे, त्याचे मी पालन करतोय. माझे 25 वर्षांचे कार्य हिच माझी खरी ताकद असून आता मतदारांनी निवडणूक हातात घेतली असल्याचे शिक्षक मतदार संघाचे बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंके यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
बंडखोरी केल्यामुळे सोळुंके यांची पक्षातून हक्कालपट्टी झाली आहे. विक्रम काळे यांच्या प्रमाणे त्यांच्याकडे शिक्षण संस्था, मनुष्यबळ, आर्थिक रसद नाही. मग ते कशाच्या पाठबळावर निवडणूक लढवत आहेत? समोरचे गणित कसे सोडवणार? याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, ते पुढे म्हणाले की, पक्षावर प्रेम करणारे पण लाभार्थी नसलेले कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत.
अनेक शिक्षण संस्था चालक व शिक्षक मतदार विक्रम काळेंवर नाराज आहेत. त्यांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मी माघार घेतलेली नाही. पक्षासाठी शिक्षक नोकरीचा राजीनामा दिला. अहोरात्र पक्ष बांधणी केली. तरी तिकीट मला न देता काळेंना दिले व माझी हक्कालपट्टी केली. यामुळे शिक्षक मतदार संघातून सहनभुती मिळत आहे. हायकोर्टातून हक्कालपट्टी झाली असली तरी शरदचंद्र पवार यांच्या सुप्रीम कोर्टात विजयी होऊन दाद मागणार आहे. तिथे मला न्याय नक्कीच मिळेल, असा विश्वासही सोळुंके यांनी व्यक्त केला. निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धारही स्पष्ट केला.