पंढरपूर23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मी महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे. मागच्या गोष्टी होत्या त्या सोडून मी पुढे निघाली आहे. मात्र तुम्हाला गौतमी पाटीलच दिसते का? मी काय महाराष्ट्राचा बिहार केला? याचे उत्तर द्या. मी कुठे चुकले ते सांगा , असे म्हणत प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने छोटा पुढारी घनश्याम दरोडेसह टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. फेमस होण्यासाठी तिला चुकीच्या वळणावर नेऊ नका. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असे आवाहन छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला केले होते. त्यावर आता गौतमीनेही छोट्या पुढारीला प्रत्युत्तर दिले आहे.
मी काय चुकले?
गौतमी पाटील म्हणाली, कोण काय बोलले माहित नाही. मी व्हिडिओ पाहिलेला नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे. ज्याकाही मागच्या गोष्टी होत्या त्या सोडून मी पुढे निघाली आहे. माझ्यात झालेल्या सुधारणा तुम्हाला दिसत असतील. मी काय म्हणते तुम्हाला गौतमी पाटीलच दिसते का? मी काय महाराष्ट्राचा बिहार केला. कुठे महाराष्ट्राचा बिहार केला. अजून आहेत इतरही अनेक आहेत त्यांच्याकडे पाहा. मी काय चुकले, ते मला सांगा.
अजून माझे लग्न ठरलेले नाही
गौतमी पाटील म्हणाली, माझे कार्यक्रम पाहायला येणाऱ्यांना एकच विनंती आहे की वाद घालू नका. कोणाला मारहाण करु नका. आयोजकांच्या वेळेनुसार मी कार्यक्रम सुरु करते. पोलिस खूप सहकार्य करतात. 10 नंतर मला कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही. पोलिसांच्या परवानगीच्या पुढे मी जाऊ शकत नाही. अजून माझे लग्न ठरलेले नाही, तशा बातम्या आलेल्या माझ्या वाचनात आल्या. मात्र अजून तरी माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही. जेव्हा मी लग्न करणार असेल तेव्हा मी कळवेल.
नेमके काय म्हणाले घनश्याम दराडे?
घनश्याम दराडे म्हणाला, लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्ही कला चांगल्या पद्धतीने करत आहात. कलेला तिच्या जागेवर राहू द्या. तिला दुसरीकडे नेऊ नका. फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय सुटताय, चुकीचे कृत्य करु नका. फेमस व्हा पण कलेतून व्हा. महाराष्ट्राचा बिहार करु नका. जो महाराष्ट्राचा बिहार करेल त्याच्या चुकीला माफी नाही. सगळ्या तरुणांना मी हात पाय जोडून सांगतो राजे बाई नाचवणारे नव्हते तर बाई वाचवणारे होते. संस्कृतीला तडा जाता कामा नये.
संबंधित वृत्त
कलेतून फेमस व्हा:गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करू नका, छोटा पुढारी घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडत थेट आवाहन
लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. फेमस होण्यासाठी तिला चुकीच्या वळणावर नेऊ नका. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असे आवाहन छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला केले आहे. वाचा सविस्तर