मिशन इलेक्शन: अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सूद यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; पंजाब विधानसभेची घोषणा होताच निर्णय


  • Marathi News
  • National
  • Sonu Sood Sister Malvika Sood Congress | Marathi News | Sonu Sood’s Sister Malvika Sood Joins Congress, Will Contest Punjab Legislative Assembly Elections

Advertisement

5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सुद सच्चर यांनी हातात काँग्रेसचा झेंडा घेतला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मालविका सुद सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी मालविका यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, मालविका पंजाबच्या मोगा येथून काँग्रेसच्या उम्मेदवार असणार आहे. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी कमलजीत सिंह बराड यांनी मालविकाच्या पक्ष प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वीच सोनू सुदने आपल्या बहिणीच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबद कल्पना दिली होती.

Advertisement

गेल्या कित्येक दिवसांपासून राजनीतीमध्ये येण्याची चर्चा
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोनू सुद यांनी आपली बहिण मालविका राजनीतीमध्ये येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आपण राजकारण जाणार नसल्याचे सोनूने स्पष्टपणे सांगितले होते. सोनू सुदचे कुटुंब पंजाबच्या मोगा जिल्ह्यापासून ताल्लुक या ठिकाणी राहते. गेल्या वर्षी परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनूने मोठी मदत केली होती.

त्यानंतर सोनू राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाली होती. काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सुद यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून सोनू राजकारण पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना उधाण आले होते. त्यानंतर अखेर शनिवारी मालविका यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

Advertisement

डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री चन्नी सोबत झाली होती भेट

गेल्या महिन्यात सोनू सुद यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतली होती. यापुर्वी सोनू सुद यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते की, मला दोन पक्षांकडून राज्यसभेसाठी ऑफर दिली जात आहे. मात्र मी यांच्या राज्यसभेच्या ऑफरला नाकारल्याचे सोनू म्हटला होता.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement