मित्राने मित्राच्या पत्नीला फसवले!: डिलीव्हरी गर्ल म्हणून नाेकरी देण्याचे आमिषाने मित्राच्या पत्नीवर बलात्कार!


पुणे8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कामाच्या शाेधात असलेल्या महिलेला तिच्याच पतीच्या मित्राने एका कंपनीत डिलीव्हरी गर्ल म्हणून नाेकरी देताे असे आमिष दाखवले. त्यानंतर तिला काम देण्याच्या बहाण्याने एका लाॅजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली.

Advertisement

याबाबत 26 वर्षीय पीडित महिलेने काेंढवा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आराेपी आरीफ खान, रवी व रियाज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 यादरम्यान उंड्री व काेंढवा परिसरात घडला.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पतीचा आराेपी आरीफ खान हा मित्र आहे. त्याने डुनजाे डेली या कंपनीत डिलीव्हरी गर्ल म्हणून महिलेस कामास लावताे असे सांगितले. एका ठिकाणी डीलीव्हरी करायची आहे असे सांगुन त्यांना एका ठिकाणी बाेलवून घेवून उंड्री परिसरात एका लाॅज मध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरिक संबंध तिच्याशी केले. त्यानंतर हा फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देऊन आराेपी आरीफ खान याचा मित्र रवी याने महिलेकडून एक लाख रुपये घेतले. तर, आराेपी रियाज याने महिलेस धमकावल्याने सदर तिघांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा तपास काेंढवा पाेलिस करत आहे.

Advertisement

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

यवतमाळ येथे राहणाऱ्या 22 वर्षीय मुलीसाेबत अविनाश कुरेवार (रा.पांढरकवडा,यवतमाळ) या तरुणाने परस्पर तिच्या कुटुंबियांना माहिती न देता लग्न केले. त्यानंतर ती दुसऱ्या कुठल्यातरी मुलासाेबत बाेलते व फिरते असा संशय घेऊन तिला वारंवार फाेनवरुन शिवीगाळ करुन तसेच मारहाण करुन तिला त्रास करुन तिचा फाेन नंबर ब्लाॅक केल्यामुळे आलेल्या दडपणाने तरुणीने 8 जानेवारी राेजी कात्रज भागातील राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेतला.

Advertisement

याप्रकरणी मुलीच्या 48 वर्षीय वडीलांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर भारती ​​​​​विद्यापीठ पाेलिस ठाण्यात संशयित आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement