मिचेल मार्शच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने तख्त राखले; प्ले -ऑफची चुरस कायम

मिचेल मार्शच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने तख्त राखले; प्ले -ऑफची चुरस कायम
मिचेल मार्शच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने तख्त राखले; प्ले -ऑफची चुरस कायम

डेव्हिड वॉर्नरचे दमदार अर्धशतक ऋषभ पंतने दोन षटकार मारत सामना संपवला. दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्स राखत मोठा विजय संपादन केला. अखेर युझवेंद्र चहलने दिल्लीच्या ६२ चेंडूत ८९ धावा करणाऱ्या मिशेल मार्शला बाद करत दिलासा दिला. पण तेवढा पुरेसा नव्हता. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांची १४४ धावांची भागीदारी संपवली.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२च्या प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. बुधवारी झालेल्या लढतीत दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनीच राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने हा सामना जिंकला आणि १२ गुणांची कमाई केली. मार्शचे शतक थोडक्यात हुकले.

१६१ धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना दिल्लीलाही पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला के एस भरत दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला. मार्शही बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत होता, परंतु डीआरएस न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. ९व्या षटकातील दुसरा चेंडू वॉर्नरने शॉर्ट बॉस भिरकावला, परंतु सीमारेषेवर देवदत्त पडिक्कल तो जज करण्यात चुकला अन् षटकार मिळाला. पुढच्याच चेंडूवर वॉर्नरने उत्तुंग फटका मारला. यावेळेत जोस बटलरने सर्वस्व पणाला लावले, परंतु त्याच्या हातूनही झेल सुटला. हे कमी होतं की काय ६वा चेंडू यष्टींना घासून गेला अन् लाल लाईटही पेटली. पण, बेल्स न पडल्याने वॉर्नर नाबाद राहिला.

Advertisement

आयपीएलच्या ८ पर्वात वॉर्नरने ४००+ धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम केला. यासह त्याने विराट कोहली, शिखर धवन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. सुरेश रैनाने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. मार्श आज शतक पूर्ण करेल असे वाटत असताना युजवेंद्र चहलने त्याची विकेट घेतली. मार्शला ६२ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांवर माघारी परतावे लागले. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. वॉर्नर व मार्श यांनी १०१ चेंडूंत १४४ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने दोन खणखणीत षटकार खेचले. विजयासाठी ३ धावांची गरज असताना वॉर्नरने तीन धावा पळून काढल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. वॉर्नर ४१ चेंडूंत ५ चौकार व १षटकारासह ५२ धावांवर नाबाद राहिला. रिषभने ४ चेंडूंत नाबाद १३ धावा केल्या. दिल्लीने १८.१ षटकांत २ बाद १६१ धावा करून ८ विकेट्स राखून सामना जिंकला.

आयपीएलमध्ये २०२२ मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली आणि यावेळी रविचंद्रन अश्विनने दमदार फलंदाजी करत संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने अर्धशतक ठोकले, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रविचंद्रन अश्विनने ३८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. अश्विनने प्रथम यशस्वी जैस्वाल सोबत ४३ धावा आणि नंतर देवदत्त पडिक्कल सोबत ५३ धावांची भागीदारी केली. या आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विन अनेक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे, ज्यामध्ये त्याने वेगवान धावा केल्या आहेत किंवा विरोधी संघाची रणनीती अपयशी ठरवण्याच प्रयत्न केला आहे.

Advertisement

बटलर बाद झाल्यानंतर आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. अश्विनने ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्ये अश्विनविरुद्ध गोलंदाजी करावी लागेल, याची कल्पनाही दिल्लीच्या संघाने केली नसेल. पण तसेच झालं आणि त्याने याचा फायदा उठवला. मधल्या षटकांमध्ये त्याला फारशा धावा करता आल्या नसल्या तरी पॉवरप्लेच्या ओव्हर्सनंतर त्याने फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले.

रविचंद्रन अश्विनच्या या अर्धशतकाने एक विशेष विक्रमही केला आहे. सर्वाधिक डावानंतर पहिले अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने ७२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले. या यादीत सर्वात पुढे आहे रवींद्र जडेजा ज्याने १३२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले.

Advertisement

Advertisement