मार्श-वॉर्नर जोडी पडली राजस्थानवर भारी, दिल्लीचा 8 गडी राखून विजय


Advertisement

RR vs DC : यंदाच्या आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या 58 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर (RR vs DC) आठ गडी राखून विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत संघाला विजयश्री मिळवून दिला आहे.

Advertisement

सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर वन डाऊन थेट आश्विन मैदानात अवचरला आणि त्याने संघाटा डाव एकहाती सावरला. दुसऱ्या बाजूने यशस्वी, संजू हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत होते. पण आश्विनने टिकून राहत 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 48 धावांची तुफान खेळी करत संघाचा डाव 160 पर्यंत नेला. 20 षटकानंतर सहा गडी गमावत राजस्थानने 160 धावा केल्या ज्यामुळे दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान होते. यावेळी चेतन साकरिया, ए नॉर्खिया आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

वॉर्नर-मार्श जोडी राजस्थानवर भारी

Advertisement

राजस्थान संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. बोल्टने त्यांच्या केएस भरतला बाद केलं. त्यानंतर मात्र मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने टिकून राहून दमदार फलंदाजी केली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा विजय पक्का केला. मार्श 89 धावा करुन 18 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण नंतर पंतने लागोपाठ दोन सिक्स खेचले तर वॉर्नरने स्वत:चं अर्धशतक पूर्ण करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. 

हे देखील वाचा-

Advertisement



Source link

Advertisement