नगरएका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त बुरुडगाव रोडवरील ‘स्कायब्रिज’ येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात आता खूप बदल झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला, तरी ते वापरणारे कामगार महत्वाचे आहेत. प्रत्येकाने अतिशय काळजीपूर्वक सर्व सुरक्षा साधने परिधान केली पाहिजे.
Advertisement
एखादी दुर्घटना घडल्यास प्रथमोपचाराची प्राथमिक माहिती ठेवली पाहिजे. सरकारच्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तसेच विमा विषयक योजना आहेत. त्याचीही माहिती व लाभ कसा मिळवावा याची माहिती यावेळी देण्यात आली. सुरक्षा सप्ताह हा वर्षभर लक्षात ठेऊन काम केल्यास अपघात टळून कुटुंबही आनंदी ठेवावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement