मार्गदर्शन‎: भूगाेलतज्ज्ञ म्हणून काम‎ करण्याची विद्यार्थ्यांना संधी‎


नाशिक‎20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भूगोल विषयात लोकसंख्या‎ विश्लेषण, ग्रामीण विकास,‎ पर्यावरण या क्षेत्रात समाजसेवी व‎ शासकीय सेवेत करिअरच्या संधी‎ मिळू शकतात. तसेच भूगोल तज्ज्ञ‎ म्हणून विविध विभागात व संशोधन‎ क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते,‎ अशी माहिती क्रांतिवीर व्ही. एन.‎ नाईक कॉलेजमधील प्रा. स्नेहल‎ कासार यांनी दिली.‎ गोएसाेच्या नाशिकरोड येथील‎ बिटको महाविद्यालयात जागतिक‎ भूगोल दिनानिमित्त भौगोलिक‎ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले‎ होते.

Advertisement

त्याप्रसंगी भूगोल विषयातील‎ संधी या विषयावरील व्याख्यानात‎ मार्गदर्शन करताना त्या बोलत‎ होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या‎ प्राचार्या डॉ. मंजूषा कुलकर्णी, प्रा.‎ नरेश पाटील, डॉ. सुधाकर बोरसे,‎ प्रा. लक्ष्मण शेंडगे आदी मान्यवर‎ उपस्थित होते. बीएससी व बीएच्या‎ दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील‎ विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग‎ घेतला होता. सूत्रसंचालन डॉ.‎ सुधाकर बोरसे यांनी केले.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement