मार्गदर्शन: पेठे विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन; शास्त्रज्ञांच्या कार्याला उजाळा

मार्गदर्शन: पेठे विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन; शास्त्रज्ञांच्या कार्याला उजाळा


नाशिक2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रज्ञांविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील हाेते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी उपस्थित होत्या. शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका संगीता थोरात, पर्यवेक्षक रवींद्र पगार, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे, विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख पंकज वेल्हाणकर उपस्थित होते.

Advertisement

प्रभंजन रत्नाकर या विद्यार्थ्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगितली. विज्ञान शिक्षक गोविंद देशमुख यांनी विज्ञान चालिसेचे वाचन केले. ज्योती कुलकर्णी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान विशद करून विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती अंगी बाळगावी व जिज्ञासा वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. मुख्याध्यापक पाटील यांनी विज्ञानमय विचार अंगीकृत करून अंधश्रद्धा टाळाव्यात व कर्म सिद्धांतावर भर द्यावा, असे आवाहन केलेे. प्रास्ताविक पंकज वेल्हाणकर, सूत्रसंचालन हर्षल कोठावदे यांनी केले. आभार संदीप शिनकर यांनी मानले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement