मायकल क्लार्कने स्टीव्ह स्मिथला खडसावले, म्हणाला “कर्णधार नसताना…”ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने स्टीव्ह स्मिथला खडसावले आहे. स्टीव्ह स्मिथने मैदानात ढवळाढवळ करू नये तसेच त्याने कोणतेही मार्गदर्शनही करू नये, असे मायकल क्लार्कने म्हटले आहे. क्लार्कच्या मते, मैदानातील गोष्टी कर्णधार असलेल्या खेळाडूने हाताळल्या पाहिजेत. तसेच संघात एकच कर्णधार असू शकतो.

Advertisement

टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टिम पेनने २०१७ मध्ये एका मुलीला अश्लील मेसेज पाठवले होते आणि अश्लील फोटोही पाठवले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याने ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, टीम पेनच्या राजीनाम्यानंतर पॅट कमिन्स किंवा स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. यामध्ये पॅट कमिन्सचे नाव आघाडीवर आहे. 

“स्टीव्ह स्मिथने थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण टीम पेन कर्णधार असताना खूप हस्तक्षेप करत असल्याची टीका त्याच्यावर झाली होती. स्लिपमध्ये उभा राहून तो क्षेत्ररक्षकांना फिरवत होता. मैदानात एकच कर्णधार असू शकतो. जर पॅट कमिन्स कर्णधार झाला तर तो स्वतः तुमचा सल्ला घेईल पण ठरवायचे काम त्याचे आहे,” मायकल क्लार्क म्हणाला.

Advertisement

The post मायकल क्लार्कने स्टीव्ह स्मिथला खडसावले, म्हणाला “कर्णधार नसताना…” appeared first on Loksatta.Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here