मान्सून ट्रॅकर: राज्यातील किनारी भागांत एनडीआरएफची 15 पथके तैनात, मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Monsoon Rains Forecast Tracker Latest Update | Monsoon 2021 Predictions India | 15 Squads Of NDRF Deployed In Coastal Areas Of The State

Advertisement

मुंबई7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी

दक्षिण-पश्चिम मान्सूनचे बुधवारी मुंबई जोरदार आगमन झाले. बुधपारी पहाटेपासून दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले. या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सूनमुळे समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. आज सकाळपासून समुद्र खवळलेला दिसत असून, समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 15 पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरफचे अधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली.

यंदा मान्सूनचे लवकर आगमन
दरम्यान, IMD मुंबईने सॅटेलाइट ऑब्जर्वेशनद्वारे सांगितले की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 3-4 तास 2-3 सेमी/तास पावसाचा अंदाज आहे. मुंबईशिवाय, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही 10 जूनला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD मुंबईचे उप महासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी सांगितल्यानुसार, सामान्यतः मुंबईमध्ये दरवर्षी 10 जूनला मान्सून दाखल होतो, पण यंदा एक दिवस आधीच दाखल झाला आहे.

Advertisement

पावसाचा लोकल सेवेपर परिणाम
या पावसाचा परिणाम लोकलवरही झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे, आज सकाळी 9.30 पासून कुर्ला आणि CSMT स्टेशनदरम्यान असलेली लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पावसामुळे समुद्राला भरती येऊ शकते. तसेच, यावेळी 4 ते 5 मीटर उंच लाटा येण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये 11-13 जूनपर्यंत मुसळधार पाऊस

Advertisement

तिकडे गुजरातच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये दिसून येतोय. त्यामुळे या राज्यांमध्ये 11-13 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here