माननीय सोडा, माझ्या नावापुढे साधे खासदारही लिहिले नाही: मोदींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन अरविंद सावंत यांचा संताप


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आणि निमंत्रण पत्रिकेच्या एनव्हलपवर नाव नसल्याने शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

मिंधेंच्या खासदारांची नावे
खासदार अरविंद सावंत म्हणाले, हा कार्यक्रम राज्यशासन आणि मुंबई महापालिकेचा आहे. भाजपचा नाही. दुर्दैवाने पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अनेकदा वावरताना दिसत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपाचा आहे, असे वाटते. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. या पत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांचे दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपच्या खासदाराचे नाव आहे.

मनपा निवडणुकीचा प्रचार
खासदार अरविंद सावंत म्हणाले, पत्रिकेच्या पाकिटावरही माझे नाव नाही. कोरे निमंत्रण आहे. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधे खासदारही लिहीले नव्हते. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आले आहे. हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आयोजित केला आहे.

Advertisement

खोटे बोल पण रेटून बोल
खासदार अरविंद सावंत म्हणाले, आज ज्या प्रकल्पांचे उद्धाटन होत आहे ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले. आज फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. खोटं बोल पण रेटून बोला यामध्ये माहीर असेलल्या भाजपाचा हा उपक्रम आहे.

अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी काही केले नाही तर मोदींनी काय केले? गुजरातसारखी प्रेत महाराष्ट्रात वाहिली नाही. असा टोला यावेळी अरविंद सावंत यांनी शिंदे-भाजपला लगावला.

Advertisement

संबंधित वृत्त

संजय राऊत यांचा घणाघात

Advertisement

शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement