मातंग समाजाचे पुण्यात तीव्र आंदोलन: बार्टीत मातंग समाज दुर्लक्षित; गैरव्यवहार थांबविण्याची मागणी


पुणे9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) तील गैरकारभार थांबवा, सर्व 29 अनुसूचित जातींना सम प्रमाणात लाभ मिळावा ,महिला अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे ,यासह अनेक मागण्यांसाठी बुधवारी मातंग समाजाने बार्टीच्या मुख्यालय समोर आंदोलन केले .

Advertisement

या वेळी माजी मंत्री रमेश बागवे ,माजी सभागृह नेते सुभाष जगताप ,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवान वैराट,रमेश राक्षे ,अनिल हतागळे,राजू धडे ,अशोक लोखंडे ,नीलेश वाघमारे ,राजश्री अडसूळ ,अल्पना मोरे ,सुनील खंडाळे ,सचिन इंगळे ,सचिन जोगदंड ,रवी पाटोळे आदी उपस्थित होते.

बार्टीत मातंग समाजाला योग्य न्याय मिळत नसून मातंग समाजाला विविध योजना ,प्रकल्प यामध्ये जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केला .या संस्थेतून अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांना न्याय मिळणे गरजेचे आहे परंतु तसे होत नसल्याने त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर मातंग समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचं इशारा बागवे यांनी यावेळी दिला .या वेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बार्टी चे महासंचालक यांना देण्यात आले.

Advertisement

या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा

बार्टी अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींना समप्रमाणात नियोजनाचा लाभ मिळावा, बार्टीतील अनागोंदी मनमान व गलथान कारभार थांबविणे, बार्टीतील माहिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे , बार्टीतील मागील झालेल्या भ्रष्टाचाराची ईडी मार्फत चौकशी करावीव,लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर साहित्य संमेलनाचे आयोजन करावे व पुस्तक छापून समता दूत मार्फत वाटप करावे. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर.टी.) ची निर्मिती करावी.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement