माणुसकीचे दर्शन: औरंगाबादचा हरवलेला 20 वर्षांचा मुलगा सहा महिन्यांनंतर जैसलमेरला सापडला, लष्करी जवानांच्या मदतीने कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द


Advertisement

औरंगाबाद / मंदार जोशी । रवी खंडाळकर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वीस वर्षांचा झाला तरी त्याला अक्षरओळख नाही, पैसे मोजता येत नाही, बोलतोदेखील अडखळत… आईवडिलांचा फाेन नंबरही माहिती नाही. लासूर स्टेशनच्या एका मित्राला भेटायचे हाेते. त्या ठिकाणी रेल्वे जाते एवढेच माहिती होते. म्हणून घरी न सांगता रिक्षात बसून रेल्वेस्टेशनला गेला. तेथून रेल्वेत बसला आणि कुठे गेला ते कळलेच नाही. गादिया विहारजवळील शिवनगर भागात रहाणाऱ्या विजय अर्जुन गिरीची (आक्कू) ही कहाणी.

Advertisement

१४ जुलै २०२० ते ६ जानेवारी २०२२ या दरम्यान भाेळसर विजय देशभर फिरला. अखेर राजस्थानमधील जैसलमेर येथील महेश जंक्शन येथे काही लष्करी जवान त्याला भेटले. योगायोगाने ते महाराष्ट्राचे. त्यांनी विचारपूस केल्यानंतर घाबरलेल्या विजयने माझे भाऊजीदेखील पोलिस असल्याचे सांगितले आणि त्याचा घरी परतण्याचा मार्ग माेकळा झाला. ५ जानेवारी रोजी त्याचे भाऊजी मनीष गिरी यांनी त्याला घरी आणले. आपला मुलगा सुखरूप आहे हे पाहून आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबता थांबेना.

हरवलेला विजय रेल्वे बदलत बदलत प्रवास करत होता. ही रेल्वे औरंगाबादला जाते का एवढंच विचारायचा. नाही म्हटले तरी बसायचा आणि हो म्हटले तरी बसयचा. असे करत तो जैसलमेर जिल्ह्यातील महेश जंक्शन येथे पोहोचला. येथून पाकिस्तानची सीमा फक्त ८० किलोमीटर आहे. ४ जानेवारीला महाराष्ट्रातील काही जवानांनी त्याला पाहिले आणि विचारपूस केली. विजय मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत होता. जवानांच्या अंगावरील गणवेश पाहून माझे भाऊजीदेखील पोलिस आहेत. ते सिल्लोड येथे काम करतात, मनीष गिरी त्यांचे नाव आहे, असे त्याने सांगितले. त्या नंतर एका जवानाने माणुसकी दाखवत त्याच्या सिल्लोड येथील एका मित्राला फोन केला. योगायोगाने हा मित्र विजयचे भाऊजी मनीष यांना ओळखत होता. त्यांनी विजय सापडला असल्याचे तत्काळ भाऊजींना कळवले. मनीष यांनी देखील तत्काळ जवानांशी संपर्क साधत मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री करून घेतली. तोपर्यंत विजय सुरतला जाणाऱ्या काही जवानांसोबत गुजरातमध्ये आला. विजयचा भाऊजीने तत्काळ सुरत गाठत विजयला घरी आणले.

Advertisement

विजयला संपूर्ण गल्लीत ‘आक्कू’ म्हणतात. लहानपणापासून गतिमंद असल्यामुळे तो शाळेत गेलाच नाही. त्यामुळे लिहिण्या-वाचण्याचा प्रश्नच नाही. मात्र अंगकाठीने चांगला असलेला विजय गल्लीतल्या प्रत्येकाच्या हकेला ओ द्यायचा. जमेल तशी मदत करायचा. त्यामुळे सगळ्यांचा लाडका. वडील वाळूज येथील कंपनीत कामगार, आई गृहिणी, मोठा भाऊ खासगी नोकरी करतो तर मोठी बहीण विवाहित. २० वर्षांच्या विजयला अगदी लहान मुलासारखेच सांभाळावे लागते. दिवसभर आई आणि कंपनीतून आल्या नंतर वडील त्याच्याकडे कायम लक्ष द्यायचे. अगदी भाजीमंडीत हात चुकला तरी कावरा बावरा होणारा विजय सहा महिने जेवला कुठे, झोपला कुठे हे त्याला नीट सांगताही येत नाही. मात्र तो सुखरूप घरी पोहोचला. मात्र ताे सुखरूप घरी परतल्यामुळे अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे, असे आक्कूचे आईवडील सांगतात.

आक्कू सापडल्याच्या आनंदात मित्रांनी ठेवले स्टेटस
आक्कू हा गादिया विहार शिवनगरमधील सगळ्यांच्या परिचयाचा. जवळच असलेल्या हनुमान मंदिरात दर शनिवारी आरतीच्या वेळी तो घंटा वाजवतो. सहा महिन्यांनंतर तो सुखरूप घरी परतल्याचे कळताच परिसरातील मुलांनी, मोठ्या माणसांनी, महिलांनी गर्दी केली. त्याला आंजारले गोंजारले. अनेक मुलांनी तो परत आल्याचे व्हाॅट‌्सअॅपला स्टेटस ठेवले. शनिवारी त्याच्या हाताने हनुमान मंदिरात महाआरतीदेखील ठेवण्यात आली आहे. या सहा महिन्यांच्या प्रवासात विजयला बरीच समज आली आहे. तो आता नीट बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. हा बदल पाहून त्याचे कुंटुबीय अधिक आनंदी झाले आहेत.

Advertisement

सहा महिन्यात घरी एकही सण नाही
१४ जुलै रोजी आक्कू हरवला. जवाहरनगर ठाण्यात तो हरवल्याची नोंद आहे. मात्र त्याच्याजवळ मोबाइल नाही. ६ महिन्यांत त्याचा एकही फोन आला नाही. त्याला कोणी पाहिलेही नाही. कुटुंबीयांनी शहरभर तो हरवल्याचे पोस्टर लावले. दिवसरात्र एक करून त्याचा शोध घेतला. ६ महिन्यांत नको ते विचार मनात येऊन गेल्याचे विजयचे आईवडील सांगतात. घरात न दिवाळी झाली, ना गणेश उत्सव. त्याच्या आवडीचे पदार्थदेखील झाले नाहीत. आईने बाजारात जाणे बंद केले होते. मात्र ५ जानेवारी रोजी व्हिडिआे कॉलवर आक्कूला पाहिले आणि सगळ्यांच्या जिवात जीव आला. आणि गुरुवारी सहा जानेवारी रोजी विजय घरी सुखरूप पोहोचला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement