माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश: शिर्डीत ठाकरेंची ताकद वाढणार, समर्थकांसह मुंबईकडे रवाना

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश: शिर्डीत ठाकरेंची ताकद वाढणार, समर्थकांसह मुंबईकडे रवाना


मुंबई7 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिर्डीत ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हेदेखील आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारीच त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.

Advertisement

नगर जिल्ह्यात ताकद वाढणार

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे पुन्हा हे मतदारसंघ जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार उद्धव ठाकरेंकडून शोधला जात आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळ् अहमदनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

Advertisement

वाकचौरे शिर्डीहून रवाना

दरम्यान, मातोश्रीवरील पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळीच नगर जिल्ह्यातील आपल्या समर्थकांसह शिर्डीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ‘सुबह का भुला श्याम को घर लौटे तो उसे भुला नहीं कहते ‘ अशी प्रतिक्रिया वाकचौरे यांनी शिर्डीतून निघताना दिली आहे. शिर्डीतून वाकचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

शिवसेना-काँग्रेस-भाजप अन् पुन्हा शिवसेनेत

दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Advertisement

राष्ट्रावादीचे माजी आमदारही ठाकरे गटात?

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. येत्या 2 सप्टेंबरला बैठक होणार असून त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान हरिदास भदे हे वंचित म्हणजेच पूर्वीच्या भारिप बहूजन महासंघाच्या तिकीटावर 2004 ते 2014 या कालावधीत अकोला पूर्वचे आमदार होते. दरम्यान सुरुवातीला भारिप, काँग्रेस पुन्हा वंचित त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा भदेंचा राजकीय प्रवास आहे.

AdvertisementSource link

Advertisement