महेंद्रसिंग धोनी एवढा भावनिक होण्यामागचे नेमके कारण काय, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा

महेंद्रसिंग धोनी एवढा भावनिक होण्यामागचे नेमके कारण काय, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा
महेंद्रसिंग धोनी एवढा भावनिक होण्यामागचे नेमके कारण काय, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा

महेंद्रसिंग धोनीने भारताला २००७ आणि २०११ साली विश्वचषक जिंकवून दिले. पण या दोन्ही वेळेला धोनी हा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. पण चेन्नईच्या संघाला संबोधित करत असताना मात्र धोनी हा भावुक झाल्याचा खुलासा आता चेन्नईचे प्रशिक्षक माइक हसी यांनी केला आहे. धोनी नेमका कोणत्या गोष्टीमुळे भावूक झाला होता, जाणून घ्या…महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच शांत असल्याचे पाहायला मिळते. मैदानात तो कधीही भावूक झालेला पाहायला मिळालेला नाही. पण चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षकांनी आता याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पण धोनी एकदा रडायलाच लागला, असा खुलासा चेन्नईच्या संघाचे प्रशिक्षक माइक हसी यांनी केला आहे.

धोनीबाबत माइक हसीने कोणता खुलासा केला आहे, पाहा…

Advertisement

धोनीने भारतासाठी दोन विश्वचषक जिंकले होते. पण या दोन्ही वेळेला तो भावूक झालेला पाहायला मिळाला नाही. पण चेन्नईच्या खेळाडूंबरोबर असताना धोनी एकदा रडायला लागला होता. याबाबत हसी यांनी सांगितले की, ” धोनी हा चेन्नईच्या खेळाडूंसाठी एक भाषण करत होता. चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची बंदी आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईचा संघ मैदानात उतरणार होता. धोनी आणि चेन्नईचा संघ हे एक अतुट नाते आहे.

चेन्नईच्या संघासाठी हा हंगाम खास होता, धोनीदेखील पुन्हा एकदा संघात परतला होता. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी धोनी हा संघाला संबोधित करत होता. त्यावेळी धोनी हा भावुक झाल्याचे दिसत होते, त्याचबरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रूही येत होते आणि तो रडत होता. धोनी त्यावेळी सर्वात जास्त भावूक झाला होता. धोनीच्या या भाषणाचा संघावर चांगलाच परिणाम झाला. कारण या हंगामात चेन्नईच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. धोनीनेही या हंगामात चांगली फलंदाजी केली होती.”

Advertisement

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी या प्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या दोन वर्षांच्या काळात धोनी हा पुण्याच्या संघाकडून खेळत होता. पण चेन्नईवरील बंदी जेव्हा २०१८ साली उठवण्यात आली तेव्हा धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात दाखल झाला होता. त्यामुळे धोनीला जुन्या गोष्टी आठवल्या आणि तो २०१८ साली आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी भावुक झाला होता. धोनीने या वर्षी चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते. पण रवींद्र जडेजा नेतृत्व करण्यात अपयशी ठरल्यामुळे पुन्हा एकदा धोनी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

Advertisement