महेंदसिंग धोनी कर्णधारपदी येताच चेन्नई सुपर किंग्स आली ट्रकवर; ऋतुराजच्या ९९ धावा आल्या कामी

महेंदसिंग धोनी कर्णधारपदी येताच चेन्नई सुपर किंग्स आली ट्रकवर; ऋतुराजच्या ९९ धावा आल्या कामी
महेंदसिंग धोनी कर्णधारपदी येताच चेन्नई सुपर किंग्स आली ट्रकवर; ऋतुराजच्या ९९ धावा आल्या कामी

चेन्नईचा कर्णधार बदलला अन् संघ विजयी ट्रॅकवर परतला. चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव करत हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला. सीएसकेचे २०३ धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. त्यांना २० षटकात ६ बाद १८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत ६४ धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ४ बळी टिपले. तर फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने ९९ धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. डेव्हॉन कॉनवॉयने ८५ धावा केल्या.

आयपीएल २०२२च्या हंगामात डबल हेडरमधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२च्या ४६व्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने १३ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे आणि मुकेश चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकात फक्त २ विकेट्स गमावत २०२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला ६ विकेट्स गमावत १८९ धावाच करता आल्या.

Advertisement

निकोलस पूरनची अर्धशतकी खेळी व्यर्थ

या पराभवामुळे त्यामुळे त्यांना या हंगामात चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. कर्णधार केन विलियम्सनने ४७ धावा चोपल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अभिषेक शर्माने ३९ धावांचे योगदान दिले. तसेच, एडन मार्करमने १७, तर शशांक सिंगने १५ धावा केल्या.

Advertisement

यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मिशेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियसन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक धावा

Advertisement

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५७ चेंडूत ९९ धावांची खेली केली. या धावा करताना त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा कुटल्या. यामध्ये ४ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. पुढे कर्णधार एमएस धोनी ८ धावा करून बाद झाला, तर जडेजा १ धावेवर नाबाद होता.

या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत नवव्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघ चौथ्या स्थानी कायम आहे.

Advertisement