महिला टी-२० चॅलेंजमध्ये सुपरनोव्हाजची विजयी सलामी,४९ धावांनी जिंकला सामना

महिला टी-२० चॅलेंजमध्ये सुपरनोव्हाजची विजयी सलामी,४९ धावांनी जिंकला सामना
महिला टी-२० चॅलेंजमध्ये सुपरनोव्हाजची विजयी सलामी,४९ धावांनी जिंकला सामना

सुपरनोव्हाज विरुद्ध ट्रेलबेझर्स संघात सोमवारी महिला टी२० चॅलेंज २०२२चा पहिला सामना खेळला गेला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात सुरुवातीपासूनच सुपरनोव्हाज संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजीत त्यानंतर गोलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत सुपरनोव्हाजने ४९ धावांच्या फरकाने हा सामना खिशात घातला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित २० षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ट्रेलब्लेझर्सचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांना ११४ धावाच करता आल्या. या डावात सुपरनोव्हाजकडून पूजा वस्त्राकारने जबरदस्त गोलंदाजी केली. तिने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त १२ धावा दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तसेच मेघना सिंग, ऍलाना किंग, सोफी एक्लेस्टोननेही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करण्याचा कारनामा केला.

सुपरनोव्हाजची फलंदाजी फळी कोसळली

सुपरनोव्हाजच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेलब्रेझर्सचा संघ पुरता फ्लॉप ठरला. सलामीला येत कर्णधार स्म्रीती मंधानाने २३ चेंडूत ३४ धावांची कर्णधार खेळी केली. तर जेमिमाह रोड्रिगेजने २४ धावांची चिवट झुंज दिली. हिली मॅथ्यूजही १८ धावा करून बाद झाली. शेवटी रेणुका सिंगने १४ धावांची झुंद दिली. मात्र ट्रेलब्रेझर्सच्या इतर फलंदाज मात्र साध्या दुहेरी धावाही करू शकल्या नाहीत. परिणामी त्यांचा संघ ११४ धावांमध्येच सर्वबाद झाला.

Advertisement

हरमनप्रीतची कर्णधार खेळी

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक ३७ धावा केल्या. २९ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तिच्याबरोबरच हरलीन डेओल (३५ धावा), सलामीवीर डिएंड्रा डॉटिन (३२ धावा) आणि प्रिया पुनिया (२२ धावा) यांनीही चांगल्या खेळी खेळत संघाचा धावफलक पुढे नेला. तसेच पूजा वस्त्राकारने १४ धावा जोडत संघाला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

Advertisement

या डावात ट्रेलब्रेझर्सकडून हिली मॅथ्यूज आणि सलमा खातूनने जबरदस्त गोलंदाजी केली. मॅथ्यूजने आपल्या कोट्यातील ४ षटके टाकताना ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर सलमा खातूनने ४ षटकांमध्ये ३० धावा देत २ फलंदाजांना पव्हेलियनला धाडले. याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवने प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.

Advertisement