महिला आयपीएलची धूम आजपासून सुरु होणार; कशी असेल महिला टी२० चॅलेंज मालिका वाचा…

महिला आयपीएलची धूम आजपासून सुरु होणार; कशी असेल महिला टी२० चॅलेंज मालिका वाचा...
महिला आयपीएलची धूम आजपासून सुरु होणार; कशी असेल महिला टी२० चॅलेंज मालिका वाचा...

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता २४ मे पासून प्लेऑफची फेरी सुरू होईल. पण याचदरम्यान सोमवारपासून (२३ मे) महिला टी२० चॅलेंज मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका महिला आयपीएल म्हणून देखील ओळखली जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात ही स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती. पण, २०२२ मध्ये या स्पर्धेचे पुनरागमन झाले आहे.

तीन भारतीय खेळाडूंकडे कर्णधारपद

Advertisement

या मालिकेत तीन संघ खेळणार आहेत. सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी हे तीन संघ आमने-सामने येतील या संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडेच देण्यात आले आहे. सुपरनोवाजचे हरमनप्रीत कौर नेतृत्व करणार आहे, तर ट्रेलब्लेझर्सचे नेतृत्व स्मृती मंधनाकडे असणार आहे. याशिवाय दिप्ती शर्मा वेलोसिटी संघाची कर्णधार असणार आहे. तसेच प्रत्येक संघात १६ खेळाडूंची निवड झाली असून प्रत्येक संघात ४ परदेशी खेळाडू आहेत. तिन्ही संघात मिळून भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील काही स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

पुण्यात होणार स्पर्धा

Advertisement

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील (Women T20 Challenge) सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहेत. या मैदानात आयपीएल २०२२ मधील १३ सामने देखील पार पडले आहेत. महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत एकूण चार सामने होणार आहेत. यातील साखळी फेरीतील २३ आणि २६ मे रोजी होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवण्यात येईल. तसेच अंतिम सामना देखील संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. केवळ २४ मे रोजी होणारा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

तिन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांशी दोन हात करतील. त्यानंतर सर्वाधिक विजय मिळवणारे किंवा गुणतालिकेतील अव्वल दोन संघ २८ मे रोजी अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. या मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपित होणार आहेत.

Advertisement

असे आहे वेळापत्रक

२३ मे – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज, वेळ – संध्या. ७.३० वा., पुणे

Advertisement

२४ मे – सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, वेळ – दु. ३.३० वा., पुणे

२६ मे – वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, वेळ – संध्या. ७.३० वा., पुणे

Advertisement

२८ मे – अंतिम सामना, वेळ – संध्या. ७.३० वा., पुणे

असे आहेत संघ –

Advertisement

सुपरनोवाज – हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, ऍलेना किंग, आयुषी सोनी, चंदू व्ही, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्ज, प्रियांका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन अख्तर, सोफिया ब्राऊन, सुजाता मलिक, एसबी पोखरकर

Advertisement

वेलोसिटी – दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चंटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.

Advertisement