दर्यापूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जागतिक महिला दिनानिमित्ताने दर्यापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन तर्फे गुरुवारी (दि.९) विविध स्पर्धांचे शहरातील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, मॅचिंग स्पर्धा, तळ्यात मळ्यात स्पर्धा, नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स,सोलो डान्स) व विविध क्षेत्रातल्या महिलांचा सत्कार आणि संघर्षमय जीवनातून पुढे आलेल्या महिलांच्या मुलाखती, विधवा महिलांचे हळदी कुंकू,एक किंवा दोन मुली असलेल्या आईंचा सत्कार व शेवटी बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता होणारआहे.अधिक माहिती करिता आयोजक प्रा.संगीता पुंडे, आयोजन समिती सदस्य मेघाभारती, नम्रता शहा, मालिनी पाटील,वंदना ढोकणे, सीमा अरबट, विजयासाखरे, रीना तायडे यांच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.