महावितरणचे अतुल वडे यांना नेमबाजीत सुवर्ण: मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार

महावितरणचे अतुल वडे यांना नेमबाजीत सुवर्ण: मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार


अमरावती9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या दहाव्या पश्चिम विभागीय पूर्व राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारांमध्ये महावितरणचे वरिष्ठ लिपीक अतुल वडे यांनी सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल मुख्य अभियंता ज्ञानेश कुळकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इतर अधिकारीही उपस्थित होते.

Advertisement

वडे हे महावितरणच्या अमरावती ग्रामीण विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. नेमबाजी स्पर्धेत त्यांनी सहाशे पैकी ५८३ गुण मिळविले. पश्चिम विभागीय पूर्व राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत मिळविलेले सुवर्णपदक ही अमरावती परिमंडळासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत मुख्य अभियंता ज्ञानेश कुळकर्णी यांनी अतुल वडे यांचे कौतूक केले. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, दिलीप मोहोड, सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश देशमुख, कार्यकारी अभियंते भारतभूषण औगड व अनिरूध्द आलेगावकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, प्रणाली विश्लेषक राजेश दाभने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अतुल वडे यांनी याआधी २००७ मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने आयोजित अखिल भारतीय जी.वी. मावळणकर स्पर्धेत सुवर्ण आणि २००८ च्या राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटकावले आहे. त्या यशासाठी त्यांना भारत सरकारतर्फे ‘रक्षा मंत्री पदकाने’ सम्मानित करण्यात आले आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या या स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक मोहन इंद्रसिंग चव्हाण (चंदिगढ), स्नेहल राज दाभाडे आणि कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे अतुल वडे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement



Source link

Advertisement