महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करताच आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव

महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करताच आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव
महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करताच आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव

आयपीएल २०२२च्या १५ व्या मोसमातील आतापर्यंत यशस्वीरित्या ९सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. गेली २ वर्ष कोरोनामुळे चाहत्यांना स्टेडियमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. मात्र बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या १५ व्या मोसमात सर्व खबरदारी घेतली आहे. त्यानंतर कोरोनाचा ओसरता जोर पाहता स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या २५ टक्के चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

राज्य सरकारने कोरोना नियम शिथिल केल्याने ६ एप्रिलपासून  स्टेडियममध्ये ५० टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र ज्याची भिती होती अखेर तेच झालं. आयपीएल २०२२ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला कोरोना झाला आहे. आकाशने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisement

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“जवळपास कोरोनाला २ वर्ष सहन केल्यानंतर अखेर मी ही त्याच्या कचाट्यात सापडलो आहे. कोरोनाची सूक्ष्म लक्षणं आहेत. लवकरच यातून सावरेन”, असा आशावाद आकाशने या ट्विटमधून व्यक्त केला आहे. आकाशने कोरोनातून लवकरात लवकर सावरावं यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

Advertisement

आयपीएल २०२२ मध्ये आता सर्व काही सुरळीत होताना दिसत असताना, पुन्हा पुन्हा अशा बातम्या येत आहेत, ज्या धक्कादायक आहेत. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट असलेला प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा कोविड-१९ विषाणूचा बळी ठरला आहे. आकाशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे, पण इथेही दिलासा देणारी बातमी आहे.

वानखेडे स्टेडियमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह, मुंबईत आयपीएल सामन्यांवर संकट येणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यातच ८कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्टेडियमधील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासलं असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने खेळणं कितपत सुरक्षित आहेत, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

Advertisement