महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: हर्षवर्धन सदगीर, समीर शेख, वैभव माने, मुलानीची विजयी घोडदौड, पहा स्पर्धेचे चित्तथरारक फोटो


 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Pune
 • Maharashtra Kesari Wrestling Tournament Update I Harshvardhan Sadgir I Maharashtra State Wrestling Council I MP Ramdas Tadaspune Sports News I

पुणे41 मिनिटांपूर्वी

Advertisement
 • कॉपी लिंक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही 2019 चा महाराष्ट्र केसरी व नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने विजयी घोडदौड दुसर्‍या फेरीतही कायम ठेवली. मुंबईच्या आकाश गुंडसोबत झालेल्या रोमहर्षक लढतीत सदगीरने 2-1 अशी लढत जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. सुरुवातीला गुंडने ताकद पणाला लावत आपल्या खात्यात एक गुण मिळवला. मात्र मध्यंतरानंतर सदगीरने आक्रमक खेळ केला. सलग दोन गुण घेत सदगीरने विजयी बाजी मारली.

Advertisement

दिग्गज कुस्तीपटुंचीही उपस्थिती

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांची प्रत्यक्ष उपस्थिती आहे. महाराष्ट्र हिंद केसरी रोहित पटेल, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, बापूसाहेब लोखंडे, सईद चाऊस, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पोलीस उपाधीक्षक विजय चौधरी आदीची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

Advertisement

गादी विभाग (जय – पराजय)

 • सदगीरप्रमाणेच गादी विभागात बुलढण्याच्या समीर शेखने नाशिक शहराच्या कार्तिक गवई याला पराभूत केले
 • वाशीमच्या वैभव माने याने परभणीच्या धनराज नवघरे याच्यावर विजय मिळवला.
 • रत्नगीरीचा दादूमिया मुलाणी आणि पुणे जिल्ह्याच्या आकाश रानावडे यांच्यातील चुरशीच्या लढतीत मुलाणीने रानवडेला पराभूत केले.
 • वर्धाचा संतोष जगताप गैरहजर राहिल्याने अक्षय मंगवडेने पुढील फेरीत प्रवेश केला.
 • बीडच्या अक्षय शिंदे आणि मुंबईच्या अनिकेत मंगडे यांच्यातही जोरदार लढत झाली. अक्षयने उत्तम खेळ करत अनिकेतला पराभूत केले.
 • पुण्याच्या तुषार दुबे आणि तुषार वरखंडे या दोन मल्लांमध्ये झालेल्या लढतीत दुबेने विजय मिळवला.
 • पिंपरी चिंचवडच्या शेखर शिंदेने औरंगाबादच्या मेघनाथ शिंदेला पराभूत केले.

माती विभाग (जय – पराजय)

Advertisement
 • माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने नांदेडच्या अनिल जाधवला 5-0 अशा फरकाने पराभूत केले.
 • 2019 चा उपमहाराष्ट्र केसरी व लातूरचा मल्ल शैलेश शेळके याने परभणीच्या राकेश देशमुखला धूळ चारली.
 • पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने एकतर्फी लढत देत आतिक शेख याचा 10-0 असा दणदणीत पराभव केला.

सामन्याचे अपडेट्स

 • गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला पराभवाचा धक्का बसला. पुण्याचा हर्षद कोकाटे कडून जोरदार पराभव झाल्याने पाटील महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.
 • माती गटात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यातही चुरशीची लढत पाहायला मिळाली.
 • शैलेश शेळकेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दोन गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. अखेरच्या टप्प्यात पृथ्वीराजने गुणाची कमाई करत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र शैलेशचा जोरदार खेळ आणि बचावात्मक पवित्रा याच्या जोरावर शैलेश शेळकेने ही लढत जिंकली.
 • महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या दुसऱ्या फेरीतील लढतीमध्ये हिंगोलीच्या दिगंबर भूतनार याने नाशिकच्या केवल भिंगारे याला चितपट करत विजय मिळवला.
 • गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी व कोल्हापूरचा मल्ल याने संकेतचा त्याचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
 • पूर्व महाराष्ट्र केसरी व नाशिकचा मॉल मल्ल हर्षवर्धन सदगीर व बुलढाण्याच्या समीर शेख व यांच्यात तुल्यबळ लढत झाली.
 • सदगीरने आपली गुणवत्ता व लय कायम ठेवत समीर शेखचा 3-0 ने पराभव केला. अखेरच्या क्षणी समीरने हर्षवर्धनवर दुहेरी पट टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदगीरने बचाव करत विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
 • सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या कुस्तीमध्ये साताऱ्याचा किरण भगत आणि गोंदियाचा महारुद्र काळे यांच्यात जोरदार लढत झाली. अखेरच्या क्षणापर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढतीत किरण भगत ने महारुद्र काळे वर पाच-चार असा विजय मिळवला
 • आजच्या दिवसाच्या आणखी एक वैशिष्ट्य होते ते असे की हर्षवर्धन सदगीर आणि समीर शेख यांच्यात गादीवर तर बाला रफिक शेख आणि संतोष मुलांनी यांच्यात माती विभागावर एकाच वेळी लढत सुरू होती.
 • समीर शेख आणि बाला रफिक शेख हे दोघे भाऊ एकाच वेळी आणि माती विभागात आपली ताकद आजमावत होते हे पाहून उपस्थित त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला विजय मिळाला तर गादी विभागात समीर शेखला पराभव पत्करावा लागला.

काटे की टक्कर!

Advertisement
 1. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि पुणे शहराचा पैलवान हर्षद कोकाटे यांच्यात अतिशय चुरशीची अशी लढत झाली. हर्षद कोकाटेने भक्कम अशी आघाडी घेत लढतीवर पकड मिळवली.
 2. उत्तरात पृथ्वीराज पाटीलने ही आक्रमक खेळी करत मध्यंतरापूर्वी तीन गुणांची कमाई केली. काटे की टक्कर झालेल्या या कुस्ती सामन्यात कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील दोघेही एकमेकांना वरचढ ठरत होते.
 3. दोन्ही दोन्ही कुस्तीगिरांना पाठीराख्यांकडून चिअर्स केले जात होते. पहिल्या राउंडमध्ये चार तीन अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर पृथ्वीराज पाटीलने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.
 4. हर्षद कोकाटेने भक्कम प्रति वार करत तीन गुणांनी आघाडी घेतली. पृथ्वीराज पाटील ने पुन्हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र हर्षद कोकाटे ने प्रत्येक आक्रमण ठोकून लावत पृथ्वीराजला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement