महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक!: गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 44 हजार 388 नव्या रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू; 207 ओमायक्रॉन रुग्णही वाढले


Advertisement

एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये दररोज वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

Advertisement

दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. सध्या देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यात 207 ओमायक्रॉनचे नवे रुग्ण
राज्यात 207 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

Advertisement

मुंबईत 19 हजार 474 नवे रुग्ण
मुंबईत आज 19 हजार 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या 20 हजारांहून अधिक होती. मुंबईत रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी मृत्यूदर हा फार कमी आहे. मुंबईत आज 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले…

Advertisement

‘जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही. मात्र रुग्णांमध्ये वाढ होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी साधी लक्षणे असली तर घरीच उपचार घ्यावे. यासोबतच मास्कचा वापर करा. एवढेच नाही तर गरम पाणी आणि व्यायामही करा.’ असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement