महापालिकेचे मानसेवी कर्मचारी होणार आता कंत्राटी: 22 वर्षांच्या सेवेचे प्रशासनाने दिले फलीत, कर्मचाऱ्यांचे मनोधर्ये खचले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Municipal Corporation’s Salaried Employees Will Now Be On Contract, 22 Years Of Service Has Been Rewarded By The Administration, The Morale Of The Employees Has Weakened.

अकोला9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिकेत मागील 22 वर्षापासून मानसेवी म्हणून कार्यरत असलेले 112 कर्मचारी आता कंत्राटी होणार आहेत. प्रशासनाने या आशयाच्या नोटीस बुधवारी मानसेवी कर्मचाऱ्यांना बजावल्या. त्यामुळे 22 वर्षाच्या सेवेचे हेच ते काय फलीत? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. मात्र या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे मनोधर्ये खचले आहे.

Advertisement

महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील स्थायी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून 113 मानसेवी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यातील 112 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यापैकी काही कर्मचारी 17 वर्षापासून तर काही कर्मचारी 22 वर्षांपासून मनपात सेवा देत आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक कर्मचारी कायम आस्थापनेवर नियुक्त करण्यात आले होते. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसेवी तत्वावर नियुक्त करण्यात आले. दर सहा महिन्यांनी या कर्मचाऱ्यांना दोन दिवसाच्या खंडानंतर कामाचे आदेश दिले जातात. सन 2015 मध्ये शासनाने मनपाचा आस्थापना खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मानसेवी कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने कमी करण्याबाबत मनपा प्रशासनाला सूचित केले होते. त्याची अंमलबजावणी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी यावर्षी करण्यास सुरुवात केली आहे. मनपाच्या 112 मानसेवी कर्मचाऱ्यांना ता. 27 नोव्हेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता संपत असल्याने या सर्व मानसेवी कर्मचाऱ्यांकडून सहमतीपत्र लिहून घेतल्या जात असून, त्यासाठी प्रशासनाकडून सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांचे मनोधर्ये मात्र खचले आहे.

काँग्रेस नेत्यांची आयुक्तांसोबत चर्चा

Advertisement

मनपात अनेक वर्षांपासून सेवा देत असलेले व अनेक विभागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मानसेवी कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यास मनपाचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी यासाठी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांनी आयुक्तांसोबत बुधवारी चर्चा केली. मात्र, आयुक्त त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.

आस्थापना खर्च कमी कसा होईल?

Advertisement

आस्थापना खर्च कमी करण्यासाठी महापालिकेला उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. मात्र उत्पन्न वाढवण्याकडे दुर्लक्ष करुन केवळ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा प्रकार महापालिकेत सुरू आहे. विशेष म्हणजे मानसेवी म्हणुन कार्यरत कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेतल्यास वेतन द्यावेच लागणार आहे. त्यामुळे मुळात आस्थापना खर्च कमी होणारच नाही. उलट कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केल्यास कंत्राटदाराला कमीशन द्यावे लागणार असून कर्मचाऱ्यांना वेतन कमी मिळणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement