महाट्रेड फेअर होणार: जितो महाट्रेड फेअर‎ 2023 ची जय्यत तयारी‎


नगर‎4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझेशन‎ (जितो)च्या अहमदनगर शाखेतर्फे नगर शहरात‎ २५ ते २९ जानेवारी या कालावधीत ‘जितो‎ महाट्रेड फेअर २०२३” चे आयोजन करण्यात‎ आले आहे. नगर-पुणे रोडवरील केडगाव‎ इंडस्ट्रीयल इस्टेट समोरील १० एकरच्या प्रांगणात‎ हा महाट्रेड फेअर होणार आहे. या महाट्रेड‎ फेअरची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.‎ अलिशान टेंट उभारण्यात आला आहे. स्टॉल‎ बुकींगलाही प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी‎ दररोज विविध तज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र तसेच‎ महाराष्ट्र प्रथमच बबल थिएटरच्या माध्यमातून‎ फिल्म फेस्टिव्हलही आयोजित करण्यात आला‎ आहे.

Advertisement

नगरच्या विकासाला चालना देणारी‎ महापर्वणी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे,‎ अशी माहिती जितो अहमदनगरचे चेअरमन‎ जवाहर मुथा, प्रोजेक्ट चेअरमन अमित मुथा‎ यांनी दिली.‎ जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे व्हाईस चेअरमन‎ गौतम मुनोत म्हणाले, महाट्रेड फेअर मध्ये कृषी,‎ उत्पादने, आय.टी, टेलिकॉम, शिक्षण,‎‎‎‎‎‎ ग्राहकोपयोगी उत्पादने, अपना बाजार,‎ ॲटोमोबाईल, बांधकाम साहित्य, रियल इस्टेट,‎ अंतर्गत सजावट, लघु उद्योग, महिलांसाठी‎ घरगुती उद्योगाशी, आधुनिक तंत्रज्ञान, नगरच्या‎ वैद्यकीय क्षेत्राची प्रगती संबधित दालन संबंधित‎ ३५० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत.

या‎ महाट्रेडच्या माध्यमातून राज्यासह देशातील‎ विविध क्षेत्रातील आस्थापना, कंपन्या, उत्पादक‎ नगरमध्ये येणार आहेत. बबल थिएटरच्या‎ माध्यमातून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल‎ अहमदनगरचे आयोजन करण्यात आले आहे.‎ यात राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या फिचर‎ फिल्मस, डॉक्युमेंटरी पहायला मिळतील. २८‎ रोजी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक दिग्गज‎ सेलिब्रिटी, कलाकार येणार आहेत. बबल‎ थिएटर नगरकरांसाठी एक विलक्षण अनुभव‎ ठरेल, असा विश्वास गौतम मुनोत यांनी व्यक्त‎ केला.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement