महंत अनिकेत शास्त्री यांची मागणी: मुंबई विमानतळावर सर्व धर्मियांना पूजेसाठी जागा द्या, अन्यथा नमाजाची जागा बंद करा


मुंबई32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या. अन्यथा मुस्लिम समाजाला नमाज अदा करण्यासाठी दिलेली जागा बंद करा, अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.

Advertisement

याआधी देखील महंत अनिकेत शास्त्री यांनी ओझर येथील विमानतळाला जटायू असे नाव देण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा विमानतळावरुन त्यांनी नवीन मागणी केली आहे. जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा‎ या मागणीसाठी 2 दिवसांपूर्वी ‎ नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्री‎ यांच्या पुढाकाराने गोदावरी तिरावर साधु‎ महंतांनी आंदोलन केले होते.

हिंदू धर्मियांना टार्गेट

Advertisement

बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराच्या दाव्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. या वादात महंत अनिकेत शास्त्री‎ यांनी देखील उडी घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केवळ हिंदू धर्मियांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी हिंदू धर्मियांना पूजेसाठी जागा देण्याची मागणी केली आहे.

एका समाजाला मुभा देणे चुकीचे

Advertisement

अनिकेत शास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहिल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, देश हा संविधानावर चालतो. त्यामुळे सर्वाना समान अधिकार द्या. प्रत्येक धर्माला विमानतळावर पूजा विधी करण्यासाठी जागा द्या. सर्वच समाज त्या ठिकाणी जाऊन पूजा विधी करेल. फक्त एका समाजाला मुभा देणे चुकीचे आहे.

नमाज स्थळ बंद करा

Advertisement

पुढे महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे, सध्या या ठिकाणी मुस्लिम समाज नमाज पठण करतो. त्यामुळे मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. इतर धर्मातील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार नसाल तर मुंबई विमानतळामध्ये असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करा. अशी मागणी अनिकेत शास्त्री जोशी यांनी केली आहे.

संबंधित वृत्त

Advertisement

बागेश्वर धाम वादात नाशिकमधील साधूंची उडी

बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराच्या दाव्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. या वादात आता महाराष्ट्रातील साधू-संतांनी उडी घेतली आहे. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement