मसिआ टी – 20 स्पर्धा: मसिआ संघाचा कॉस्मो फर्स्ट संघावर मोठा विजय, मुकिम शेख, आदर्श जैनची अर्धशतके


औरंगाबाद10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मसिआतर्फे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत मसिआ इलेव्हन संघाने शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गरवारे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत मसिआने कॉस्मो फर्स्ट संघावर ७७ धावांनी मात केली. या लढतीत आदर्श जैन सामनावीर ठरला.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना मसिआने २० षटकांत ४ बाद १६२ धावा उभारल्या. यात आदर्श जैनने व मुकिम शेखने या सलामीवीर जोडीने जबरदस्त कामगिरी करत १३३ धावांची शतकी सलामी दिली. आदर्शने ५० चेंडूंत ९ चौकार खेचत सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. दुसरा डावखुरा सलामीवीर शेख मुकीमने ५३ चेंडूंत ८ चौकारांसह ६२ धावा ठोकल्या. मधुर पटेलने १० धावा केल्या. कॉस्मोकडून सनी राजपूतने १९ धावा देत २ बळी घेतले. भास्कर जीवरग व विराज चितळेने प्रत्येकी एकाला टिपले.

प्रत्युत्तरात काॅस्मो संघाचा डाव १४.४ षटकांत ८५ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार रोहन हंडीबाग अवघ्या ८ धावांवर परतला. सनी राजपूतने १७ धवा केल्या. भास्कर जिवरगने १७ आणि अमोल नागरेने १९ धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडही गाठता आला नाही. मसिआकडून मधुर पटेल, रोहन राठोड, गिरिष खत्री, धर्मेंद्र पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.

Advertisement

कंम्बाइन शेंद्राने मसिआला हरवले ॉ

दुसऱ्या लढतीत कंम्बाइन शेंद्रा संघाने मसिआ ब संघावर १४ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना राहुल पाटीलच्या (६१) अर्धशतकाच्या जोरावर शेंद्राने २० षटकांत ४ बाद १५८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मसिआ निर्धारित षटकांत ५ बाद १४४ धावा करु शकला. या लढतीत संदीप खोसरे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

AdvertisementSource link

Advertisement