मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धा: मेटलमनचा पहिला विजय, 8 गडी राखून केली मात; बजाज संघाला हरवले


छत्रपती संभाजीनगर11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मसिआच्या वतीने आयोजित टी-20 क्रिकेट स्पर्धेत मेटलमन संघाने विजय मिळवला. गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या सामन्यात मेटलमनने बजाज संघावर 8 गडी राखून मात केली. या लढतीत आर. एस. गायकवाड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बजाजचा डाव 17.2 षटकांत अवघ्या 68 धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर सागर तळेकरने 39 चेंडूंत 2 चौकार खेचत सर्वाधिक 31 धावा उभारल्या. त्याला आर.एस. गायकवाडने त्रिफळाचित करत पव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एकही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही.

इतरांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. दुसरा सलामीवीर सचिन नपतेने 7 धावांवर परतला. अमेय कामतकर 3 धावा करू शकला. संघाचे चार फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. महेश पाडळकर, विठ्ठल कांबळे, हेमंत मधुकर, ज्ञानेश्वर गावंडे हे शुन्यावर बाद झाले. आकाश पगारे 7 आणि राजेश चांदेकर 5 धावांवर परतले.

Advertisement

मेटलमनकडून आर.एस. गायकवाडने अवघ्या ८ धावा देत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अविष्कार नन्नवरे व जगदीश जाधवने प्रत्येकी तीन तीन गडी बाद केले.

सौरभ बदाडे चमकला

Advertisement

प्रत्युत्तरात मेटलमनने 10.3 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर सौरभ बेदाडेने 34 चेंडूंचा सामना करताना 5 सणसणीत चौकार खेचत नाबाद 39 धावांची कर्णधारपदाला साजेशी विजयी खेळी केली. दुसरा सलामीवीर मयूर देशमुख 3 आणि मनोज ताजी 4 धावांवर परतले. मनोज धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या गोरख घोटेकरने 18 चेंडूंत नाबाद 11 धावांचे योगदान दिले. संघाला 12 धावा अतिरिक्त मिळाल्या. बजाजकडून विठ्ठल कांबळेने एकमेव बळी घेतला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement